समिक्षकांसह प्रेक्षकांच्या पंसतीस उतरलेल्या 12वी फेल (Vikrant Massey) चित्रपटाची सध्या सगळीच चर्चा आहे. फॅन्ससह सेलेब्रिटिही चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहे. नुकतचं अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि आलिया भट्टने (Alia Bhatt) ’12th फेल’ (12th Fail) चित्रपट पाहल्यानंतर चित्रपटाचं कौतुक केलं. आता त्यांच्या पाठोपाठ अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondakar praise Vikrant Massey ) चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
[read_also content=”भारत जोडो न्याय यात्रा पोहोचली आसाममध्ये, राहुल गांधीचं मुख्यमंत्री हिमंता बिस्वांवर टिकास्त्र, म्हण्टलं सर्वात भ्रष्ट सरकार https://www.navarashtra.com/india/rahul-gandhi-called-assam-cm-most-corrupted-government-in-asaam-nrps-499430.html”]
12वी फेल हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येक उर्मिला मातोंडकर चित्रपटाची फॅन झाली आहे. चित्रपटाची कथा, स्टार्सनी केलेला अभिनय आणि दिग्दर्शन यामुळे मनाला भिडल्याचे तीने म्हण्टलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करताना तिने केवळ चित्रपटाचचं नाही तर अभिनेता विक्रांत मेसी आणि दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचेही कौतुक केलं.
Uff yeh film..so so many things to appreciate,cheer and love about it ❤️
Only @VidhuChopraa could’ve spun a story in such simple n deeply soul searching manner!
Outstanding performances by all @VikrantMassey shining the brightest??
Both him n film are deserving of national… pic.twitter.com/yEKuu8QDDt— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) January 18, 2024
’12वी फेल’ हा एक उत्तम OTT सुपरहिट चित्रपट ठरला आहे. चित्रपटाला IMDb वर 9.2 रेटिंग मिळाले आहे. समिक्षकांसह प्रेक्षकांच्या पंसतीस उतरलेल्या या चित्रपटात अभिनेता विक्रांत मेसीनं (Vikrant Massey) प्रमुख भूमिका साकारली आहे तर मेधा शंकर,अनंत जोशी, अशुंमन पुष्कर यांच्याही महत्त्वाच्या भुमीका आहेत. . आयपीएस ऑफिसर मनोज कुमार शर्माच्या बायोपिक आधारित या चित्रपट विक्रांत मेसीच्या फिल्मी करिअरमध्ये मैलाचा दगड ठरला आहे. विधु विनोद चोप्रा यांनी ’12th फेल’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ’12th फेल’ हा भावनिक सिनेमा आहे ज्यामध्ये गरीब कुंटुंबात जन्मलेल्या मुलाची नोकरी आयपीएस ऑफिसर बनण्याचा प्रवास दाखवला आहे.