
उर्मिला मातोंडकर तोडणार 8 वर्षांचा संसार (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
उर्मिला मातोंडकरने ९० चं दशक आपल्या अभिनयाने आणि नृत्याने गाजवलं होतं. अचानक तिने मोहसीन अख्तर मीरशी लग्न केल्याने तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता. महत्त्वाचं म्हणजे मोहसीन हा उर्मिलापेक्षा 10 वर्षाने लहान आहे आणि पुन्हा एकदा उर्मिला आणि मोहसीन हे चर्चेत आले आहेत, ज्याचं कारण नक्कीच चांगलं नाहीये. 8 वर्षाच्या संसारानंतर उर्मिलाने घटस्फोट दाखल केला असल्याचं सांगण्यात येत आहे.
अजूनही दोघांकडून कोणतेही अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही. वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असलेली उर्मिला आणि मोहसीन यांची भेट नक्की कशी झाली आणि हा आंतरधर्मीय विवाह कसा झाला याबाबत तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल ना? जाणून घ्या दोघांची लव्ह स्टोरी (फोटो सौजन्य – Instagram)
मनिष मल्होत्रा ठरला ‘दुवा’
उर्मिला आणि मोहसीनची भेट कशी झाली
मोहसीन हा मॉडेलिंग करत होता तर उर्मिला आणि मनिष मल्होत्राची चांगली मैत्री होती. मनिषच्या भाच्याच्या लग्नामध्ये पहिल्यांदा उर्मिला आणि मोहसीन एकमेकांना भेटले आणि त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. 10 वर्षांनी लहान असणाऱ्या मोहसीनच्या प्रेमात उर्मिला इतकी बुडाली की दोघांनी धर्माचा, जातीचा आणि वयाचा विचार न करता लग्न केले.
मोहसीनने ठेवला लग्नाचा प्रस्ताव
मोहसीनने घेतला होता पुढाकार, घातली लग्नाची मागणी
मोहसीन उर्मिलाला पाहताक्षणी प्रेमात पडला होता आणि मैत्रीनंतर ते एकमेकांना भेटू लागले नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मोहसीनने उर्मिलाला लग्नासाठी प्रपोज केले होते. सुरुवातीला उर्मिलाला पहिल्यांदा बराच संकोच वाटला होता. मात्र मोहसीनने धीर सोडला नाही आणि अखेर उर्मिलाने त्याला लग्नासाठी होकार दिला.
मोहसीनने उर्मिलाला नेहमी ठेवले आनंदी
मोहसीनने उर्मिलाचा होकार मिळविण्यासाठी नेहमीच तिला आनंदी ठेवले. उर्मिलाला गिफ्ट्स देणे, तिची काळजी घेणे या सगळ्या गोष्टी त्याने केल्या होता आणि त्यानंतर तिचे मन जिंकले आणि तिचा लग्नाला होकार मिळवला. 3 मार्च 2016 रोजी दोघांनी लग्न केले. आधी त्यांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले आणि नंतर निकाह सोहळा पार पडला होता. उर्मिलाने आतापर्यंत तिचे वैयक्तिक आयुष्य खूपच खासगी ठेवले होते
बाळ का नाही झाले
मूल का नाही झाले यावर दिली होती प्रतिक्रिया
50 वर्षांची असणारी उर्मिलाने बाळाला जन्म दिला नाही तिला याबाबत एका मुलाखतीदरम्यानही विचारण्यात आले होते. तिने त्यावर आपले मत मांडले होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकरने कुटुंब नियोजन आणि मुलांबद्दल प्रतिक्रिया दिली होती. मातृत्वाबद्दल बोलताना ती म्हणाली होती, ‘जेव्हा घडायचे आहे, ते होईल. प्रत्येक स्त्री आई झालीच पाहिजे असे नाही. मला मुलं खूप आवडतात. पण इथे अनेक मुले आहेत ज्यांना आमच्या प्रेमाची आणि काळजीची गरज आहे. मुल फक्त तुमच्याच जन्माला आले पाहिजे असे नाही.’
सोशल मीडियावर फोटो नाही
मोहसीनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच उर्मिलाचे फोटो शेअर केले जायचे. मागच्या वर्षी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मोहसीनने दिल्या होत्या. त्यानंतर दोघांचेही फोटो दिसून आलेले नाहीत. त्यामुळे आता घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या ठरणार की अफवा हे पाहावे लागेल. मात्र उर्मिलाच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला आहे.