(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
या वर्षात अनेक मोठे चित्रपट रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाले. त्याच वेळी, मोस्ट अवेटेड चित्रपट ‘पुष्पा 2’ वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे. जसे जसे दिवस पुढे जात आहेत तेवढीच या चित्रपटाची चाहत्यांमधील उत्सुकता वाढत आहे. अलीकडेच, निर्मात्यांनी अल्लू अर्जुनचे नवीन पोस्टर रिलीज केले होते, ज्यामध्ये त्याचा स्वॅग पुन्हा एकदा दिसला. चित्रपटाच्या रिलीजची आठवण शेअर करण्यासोबतच ‘पुष्पराज’चे नवे पोस्टर नेत्रदीपक शैलीत रिलीज करण्यात आले होते. याचदरम्यान या चित्रपटाबाबत अभिनेत्री तृप्ती डिमरीबद्दल एक अपडेट समोर आले आहे.
‘पुष्पा 2’मध्ये धमाकेदार गाण्यात दिसणार तृप्ती
‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाचा पहिला भाग २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात सामंथा रुथ प्रभूने ‘ऊ अंटवा’ या गाण्यावर डान्स केला होता, जो खूप लोकप्रिय झाला होता. अल्लू अर्जुन आणि समंथा रुथ प्रभू यांच्या धमाकेदार केमिस्ट्रीने लोकांची मने जिंकली. पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही निर्मात्यांनी अप्रतिम धमाकेदार गाण्याची योजना आखली आहे. या गाण्यात तृप्ती डिमरी दिसणार अशी चर्चा होत होती.
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, तृप्ती डिमरी यांनी पुष्पा 2 या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. एका स्पेशल डान्स नंबरसाठी अभिनेत्रीने ऑडिशन दिले असल्याचे समजले. ‘ॲनिमल’ या चित्रपटातून अभिनेत्रीने आपली कला दाखवली, मात्र ती या ऑडिशनमध्ये उत्तीर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे तृप्ती डिमरी पुष्पा २ मधून चर्चेत आली आहे. तसेच,पुष्पा २ हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. आणि प्रेक्षकांना वर्षाच्या शेवटी हा चित्रपट पाहता येणार आहे.
हे देखील वाचा- “मी माझी स्वत:ची कथा वाचत आहे”, ‘रात जवां है’मधील बरूण सोबतीने भूमिकेबाबत स्पष्ट केले मत!
तृप्ती राजकुमार रावसोबत धमाल करणार आहेत
तृप्ती डिमरीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे तर अभिनेत्रीचा ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ रिलीज होणार आहे. या सिनेमात ती राजकुमार रावसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.






