ज्येष्ठ कवी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान
ज्ञानपीठ पुरस्काराला (Gyanpith Award) भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराप्रमाणेच सर्वश्रेष्ठ मानले जाते. तोच भारतीय साहित्य जगतातील सर्वोच्च समजला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदाचा ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रसिद्ध उर्दू कवी, शायर, गीतकार गुलजार यांना प्रदान करण्यात आला आहे. शब्दांसोबत मैत्री करुन मनातल्या भावना लिहिणारे शायर यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.
यंदाच्या वर्षीचा ५८ वा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार गुलजार यांना त्यांच्या वांद्रे येथील निवसस्थानी प्रदान करण्यात आला. वयोमानामुळे आणि प्रकृती अस्वास्थामुळे गुलजार यांना काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये पार पडलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी गुलजार यांना उपस्थित राहता आलं नाही. त्यामुळे त्यांना राहत्या घरी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी ज्ञानपीठचे विश्वस्त मुदित जैन, माजी सचिव धर्मपाल आणि महाव्यवस्थापक आर.एन.तिवारी यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला. ११ लाख रुपये रोख, वाग्देवी सरस्वतीची कांस्यमूर्ती असं या पुरस्काराचं स्वरुप असल्याचं सांगण्यात आलं.
Jnanpith Comes Home to Boskyana. Earlier this week, when the Hon’ble President of India conferred the Jnanpith Awards, Gulzar Saab couldn’t attend the ceremony due to ongoing medical rest. Today, the prestigious honour found its way to him—presented by officials at his… pic.twitter.com/kRICNWKM4W — Pavan Jha (@p1j) May 22, 2025
गुलजार यांना पुरस्कार प्रदान करतेवेळी त्यांचे जावई गोविंद सिंधू, चित्रपट दिग्दर्शक- संगीतकार विशाल भारद्वाज आणि त्यांच्या पत्नी रेखा भारद्वाज यांच्यासह इतरही साहित्यिकांची उपस्थिती होती. गुलजार यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे. भारतातील एक कवी, गीतकार आणि सिनेदिग्दर्शक, निर्माते अशी त्यांची ओळख आहे. लहानपणापासून त्यांना शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली. विशिष्ट शब्दशैलीसाठी ते ओळखले जातात. आनंद, ओंकारा, खामोशी, थोडीसी बेवफाई, दो दूनी चार, बंटी और बबली, सफर अशा अनेक सिनेमांतील गीते त्यांनी लिहिली आहेत. ‘धुआँ’ या कथासंग्रहासाठी २००२ मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. २००४ मध्ये पद्मभूषण तर २०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.