दाक्षिणात्या सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ मल्याळम अभिनेता जॉनी जोसेफ, ज्यांना कुंद्रा जॉनी म्हणूनही ओळखले जाते, त्यांचे मंगळवारी निधन (malayalam actor kundara johny passes away) झाले. वयाच्या 71 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छातीत दुखू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच निधन झाल्याचं डॅाक्टरांनी घोषित केले. त्यांच्या निधनामुळे मल्याळम सिनेसृष्टीतून मोठा धक्का बसला आहे.
[read_also content=”इस्रायलनं गाझात केला एयरस्ट्राईक! रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात 500 नागरिकांचा मृत्यू, हमास आणि इस्रायलचा एकमेकांवर आरोप https://www.navarashtra.com/world/airstrike-on-hospital-in-gaza-500-people-died-nrps-471411.html”]
कुंद्रा जॉनी यांनी आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत आपली अद्वितीय प्रतिभा दाखवली. मल्याळम चित्रपटसृष्टीतील आपल्या अद्वितीय अभिनयामुळे त्यांनी ओळख मिळवली आहे. त्यांचे पार्थिव बुधवारी (18 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता कोल्लम कडपक्कडा स्पोर्ट्स क्लब येथे लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता कुटुंबीय त्यांचे पार्थिव घरी घेऊन जाणार आहेत. त्यांच्या पार्थिवावर 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सेंट अँथनी चर्च, कांजिराकोडे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी स्टेला आहे, जी कोल्लममधील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे.
मल्याळम अभिनेता कुंद्रा जॉनीने वयाच्या 23 व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी 1979 च्या मल्याळम चित्रपट नित्या वसंतममध्ये 55 वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी गॉडफादर (1991), इन्स्पेक्टर बलराम (1991), अवनाझी (1986), राजविंते माकन (1986), ओरू सीबीआय डायरी कुरिप्पू (1988), किरीडोम (1989), ओरू वदक्कन वीरगाथा (1989), समोहम (1989) या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1993), चेंकोल ( आराम थंपुरन (1997), वर्णपाकिट्टू (1997) सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.