Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhaava Movie: ‘हमारी सबसे बडी कमाई…’, थिएटरमधील छोट्या मुलाने दिलेली गर्जना ऐकून विकी भावुक

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित असलेला लक्ष्मण उतेकर दिगदर्शित ‘छावा’ चित्रपट पाहून प्रत्येक प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी थिएटरमधून बाहेर पडताना दिसत आहे. याच दरम्यान एका चिमुकल्याचाही व्हिडिओ व्हायरल होतो.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 17, 2025 | 06:05 PM
Chhaava Movie: 'हमारी सबसे बडी कमाई...', थिएटरमधील छोट्या मुलाने दिलेली गर्जना ऐकून विकी भावुक

Chhaava Movie: 'हमारी सबसे बडी कमाई...', थिएटरमधील छोट्या मुलाने दिलेली गर्जना ऐकून विकी भावुक

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित चित्रपटाचे फक्त देशातच नाही तर, परदेशातही हाऊसफुल्ल शो पाहायला मिळत आहे. चित्रपटाने फक्त तीन दिवसातच १०० कोटींचा टप्पा गाठत बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित असलेला हा चित्रपट पाहून प्रत्येक प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी थिएटरमधून बाहेर पडताना दिसत आहे.

देशभरात ‘छावा’चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून निर्मात्यांसह दिग्दर्शकच नाही तर, विकी कौशलही भारावला आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका छोट्या मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा शिवगर्जना देताना दिसतोय. ही गर्जना करतानाही त्याच्या डोळ्यात पाणी येत आहे. विकीने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू येईल.

प्रियेश आणि सानिकाची लव्हेबल केमिस्ट्री ‘मन उडू लागलं…’ गाण्यातून दिसणार, प्रेमीयुगुलांच्या मनाचा ठाव घेणारं गाणं रिलीज

काही तासांपूर्वीच अभिनेता विकी कौशल ह्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘छावा’पाहून एक पाच ते सहा वर्षांचा लहान मुलगा भावूक झाल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये, हा मुलगा हृदयावर हात ठेवून रडताना दिसत आहे. विक्की कौशलने इन्स्टाग्रामवर त्या लहान मुलाचा गर्जना देतानाचा व्हिडिओ शेअर करताना व्हिडिओला कॅप्शन दिलेय की, “आमची सर्वात मोठी कमाई! तुझा अभिमान आहे बाळा… मला तुला मिठी मारता आली असती तर बरे होईल. तुमच्या प्रेमाबद्दल आणि भावनांबद्दल सर्वांचे आभार. शंभू राजेंची कहाणी जगातील प्रत्येक घरात पोहोचावी अशी आमची इच्छा होती… आणि हे घडताना पाहणे हा आमचा सर्वात मोठा विजय आहे. चित्रपटगृहात छावा.”

 

From China With Love सतर्कतेचा इशारा द्यायला येतोय; ऑनलाइन घोटाळ्यापासून सावध करणारा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

व्हिडीओमध्ये पाच ते सहा वर्षांचा चिमुकला ‘छावा’चित्रपट थिएटरमध्ये संपल्यानंतर रडत छातीवर हात ठेवून गर्जना देताना दिसत आहे. चिमुकल्याने थिएटरमध्ये गारद म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली आहे. यावेळी त्याने ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणाही दिल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अभिनेता आयुषमान खुराना, डान्सर धर्मेशनेही कमेंट केली आहे. दरम्यान, पाच ते सहा वर्षांच्या चिमुकल्याच्या व्हिडिओवर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात असून हजारो युजर्सने व्हिडिओ शेअर केला आहे.

Ziddi Girls: ‘झिद्दी गर्ल्स’ धमाकेदार सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित; जाणून घ्या कुठे, कधी पाहता येईल ही मालिका?

‘छावा’चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत ११६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने ३१ कोटी, विकेंडच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी ३७ कोटी, रविवारी अर्थात रिलीजच्या तिसऱ्या दिवशी ४८. ५० कोटींची कमाई केलेली आहे. रविवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली होती. १४ फेब्रुवारीच्या दिवशी रिलीज झालेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १०० कोटींचा टप्पा पार करणारा ‘छावा’चित्रपट हा विकी कौशलच्या करिअरमधील सहावा आणि रश्मिका मंदानाच्या करिअरमधील आठवा चित्रपट ठरला आहे.

Web Title: Vicky kaushal shared child video who cried in theater after watching chhaava movie watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 06:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.