(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
आगामी ओटीटी मालिका ‘जिद्दी गर्ल्स’ चा ट्रेलर लाँच झाला आहे. मालिकेच्या ट्रेलरसोबतच निर्मात्यांनी त्याची रिलीज डेटही जाहीर केली आहे. या मालिकेची कथा काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. तसेच ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता हे आपण जाणून घेणार आहोत. ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. तसेच या मालिकेची कथा काय आहे जाणून घेऊयात.
लेखिकाने केले मालिकेचे कौतुक
लेखिका नेहा वीणा शर्मा आणि वसंत नाथया मालिकेबाबत म्हणाले की, “लेखिका आणि दिग्दर्शक म्हणून, आम्ही आमच्या महाविद्यालयीन अनुभवांना सखोलपणे समजून घेण्यासाठी बरेच संशोधन केले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र त्यांच्या स्वतःच्या संघर्षांनी वेढलेले आहे.” ही मालिका पाहताना नक्कीच प्रेक्षकांना नवा अनुभव पाहायला मिळणार आहे.
काय आहे मालिकेची कथा?
मालिकेची कथा माटिल्डा हाऊस कॉलेजच्या हॉलमध्ये सुरू होते, जी कॉलेजचे जग आणि वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या वेगवेगळ्या कथा दाखवते. ही मालिका २७ फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडिओ ओरिजिनलवर प्रदर्शित होणार आहे. जी पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. ही मालिका मुलीना खूपच पसंत पडणार आहे.
हे आहेत मालिकेतील कलाकार
ही मालिका अतिया तारा नायक, उमंग भदाना, झैना अली, दिया दामिनी आणि अनुप्रिया करोली यांसारख्या नवीन कलाकारांसह तयार करण्यात आली आहे. ही मालिका २७ फेब्रुवारी रोजी भारतात आणि जगभरातील २४० देशांमध्ये हिंदी आणि इंग्रजीमध्ये सबटायटल्ससह प्रदर्शित होणार आहे. या प्राइम व्हिडिओ मालिकेची निर्मिती प्रीतिश नंदी यांनी केली आहे. ही मालिका शोनाली बोस यांनी दिग्दर्शित केली आहे. हा चित्रपट वसंत नाथ आणि नेहा वीणा शर्मा यांनी लिहिला आहे.