विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना गेल्या वर्षी मुलगा झाला. १५ फ्रेबुवारी २०२४ ला अभिनेत्री अनुष्का शर्माने गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचं नाव अकाय कोहली असं आहे. यापूर्वी अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. विराट आणि अनुष्का हे स्टार कपलपैकी एक आहे. या जोडप्याबाबत जाणून घेण्यास चाहते फार उत्सुक असतात. विराट-अनुष्का सोशल मीडियावर कपल गोल्स शेअर करत असतात. यासोबतच ते मुलांसोबत खेळताना आणि वेळ घालवतानाचे फोटोही शेअर करतात. मात्र, अजून विराट-अनुष्काने त्यांच्या दोन्ही मुलांचा चेहरा दाखवलेला नाही. आता मात्र, अकाय कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ग्लॅमरस मीरा जगन्नाथसोबत श्रीकांत यादव करणार रोमान्स, ‘इलू इलू’ चित्रपटातील रोमँटिक अंदाज चर्चेत
अकाय कोहलीची पहिली झलक सोशल मीडियावर चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. व्हिडिओमध्ये अकाय आई अनुष्का शर्माच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये अकाय खूप आनंदी दिसत आहे. अकायची पहिली झलक पाहण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चाहते खूप खूश आहेत. अद्याप त्यांनी मुलीची पहिली झलक चाहत्यांना दाखवलेली नाही. तिला पाहण्यासाठीही चाहते खूपच आतुर आहेत. अकायचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अकायला पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याच्या क्यूटनेसचे कौतुक केले आहे. तो त्याचे वडील विराट कोहलीसारखा दिसत आहे, असं नेटिझन्सचं म्हणणं आहे. अकायसोबत त्याची मोठी बहीण वामिकाचा फोटोही व्हायरल होत आहे. कोहलीच्या दोन्ही मुलांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
“साताऱ्याची माणसं “THAR” वेडी”; आधी घर, आता नवी कार! हास्यजत्रा फेम अभिनेत्याने घेतली आलिशान कार
अलीकडेच विराट-अनुष्का दुसऱ्यांदा लोकप्रिय संत प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. प्रेमानंद महाराज यांनी दाम्पत्याची विचारपूस करून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वामिका आणि अकाय हे देखील त्यांच्या पालकांसोबत दिसले. विराट कोहलीसाठी 2024 काही खास नव्हते. त्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. अनेकांनी त्याला निवृत्ती घेण्याचा सल्लाही दिला आहे. मात्र, कोहलीला खेळताना पाहण्याची त्याच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असेल. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही तो भारतीय संघाचा भाग असू शकतो.
लग्न न करता वयाच्या ४५व्या वर्षी आई बनली ही अभिनेत्री, ‘सिंगल मदर’ म्हणून करतेय लेकीचा सांभाळ