"साताऱ्याची माणसं “THAR” वेडी"; आधी घर, आता नवी कार! हास्यजत्रा फेम अभिनेत्याने घेतली आलिशान कार
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कॉमेडी शो कायमच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करते. शो प्रमाणेच शो मधील कलाकारही कायमच आपल्या कामामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहतात. गौरव मोरे, वनिता खरात, शिवाली परब, निखिल परब, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार राऊत आणि रोहित माने या कलाकारांनी आपल्या खास मनोरंजन स्टाईलने मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे रोहित माने. आपल्या चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमातून हास्यजत्रा फेम अभिनेता रोहित मानेने आपले स्वप्न साकार केले आहे. साताऱ्याच्या रोहितने ‘थार’कारचं स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही ‘गुड न्यूज’ दिली आहे.
लग्न न करता वयाच्या ४५व्या वर्षी आई बनली ही अभिनेत्री, ‘सिंगल मदर’ म्हणून करतेय लेकीचा सांभाळ
गेल्या वर्षी अभिनेत्याने दहिसरला घर घेतलं. आता घर घेतल्यानंतर अभिनेत्याने आपल्या कारचं स्वप्न पूर्ण केलं आहे. ठिक एक वर्षांपूर्वीच अभिनेत्याने स्वत:च्या हक्काचं पहिलं घर खरेदी केलं होतं. अभिनेत्याने ‘थार’ कार घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. त्याच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘माने या ना माने’ या त्याच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवर त्याने कार घेतल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. “साताऱ्याची माणसं “THAR” वेडी” असं कॅप्शन देत अभिनेत्याने व्हिडिओ शेअर केलेला आहे. अभिनेत्याने हा व्हिडिओ काही तासांपूर्वीच शेअर केला असून त्याच्यावर चाहत्यांकडून आणि त्याच्या सेलिब्रिटी मित्रांकडून कौतुक केले जात आहे.
अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओच्या सुरुवातीलाच रोहितच्या कारची छोटीशी झलक पाहायला मिळते. त्यानंतर पुढे, रोहित आणि त्याची बायको महिंद्राच्या शोरुममध्ये जात असतात. जात असताना अभिनेत्याने आपल्या बायकोचा हात हातात घेत शोरुममध्ये जातो. त्यानंतर त्याची बायको कारच्या पेपरवर सही करताना दिसतेय आणि पुढल्या काही क्षणात अभिनेत्याची लक्झरियस काळ्या रंगाची Thar समोर दिसते. गाडीवरील लाल कापड बाजूला करत दोघंही आपल्या नव्या कारची झलक चाहत्यांना दाखवतात, त्यानंतर पूजा करतात. पूजा करत असताना अभिनेत्याची सर्व फॅमिलीही दिसते. ब्रँड न्यू लक्झरियस कारची ज्यावेळी पूजा करतात, तेव्हा अभिनेत्याच्या बायकोच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळतं.
अरे बापरे… प्रसिद्ध गायकाला ओळखणंही झालं कठीण; रक्ताने अन् धुळीनं माखलेला लूक व्हायरल
व्हिडिओच्या शेवटी, रोहित आणि त्याची बायको लाँग ड्राईव्हला जातात. सन रुफ, आकर्षक फिचर्स असलेली ‘थार’ रोहितच्या घरी आलेली आहे. कार घेतल्यानंतरचा आनंद अभिनेत्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. रोहितने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांकडून आणि त्याच्या सेलिब्रिटी फ्रेंड्सकडून व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. स्नेहल शिदम, प्रियदर्शिनी इंदलकर, निखिल बने, ऋतुजा बागवे, पृथ्विक प्रताप, समीर खांडेकर, चेतना भट, ईशा डे, वनिता खरात आणि तिचा पती सुमित लोंढेसह अनेकांनी अभिनेत्याचे कौतुक केले.