अनुष्का नाही, 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री होती विराट कोहलीचं पहिलं क्रश; स्वतः केला होता खुलासा!
टीम इंडियाचा स्टार क्रिकेट खेळाडू विराट कोहली कायमच आपल्या किर्तीमुळे तर कधी खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेत्याने आपल्या खेळाच्या माध्यमातून त्याने अख्ख्या जगभरातल्या फॅन्सच्या मनावर अधिराज्य गाजवले. विराट कोहलीचं बॉलिवूडप्रेम केव्हाही लपून राहिलेलं नाही. गेल्या अनेक वर्षांपासूनचं तो प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला डेट करतोय. पण, असं असून सुद्धा अनुष्का शर्मा त्याची पहिली क्रश नव्हती. त्याची पहिली क्रश दुसरी बॉलिवूड अभिनेत्री होती. याचा खुलासा स्वत: विराट कोहलीने एका मुलाखतीच्या माध्यमातून केलेला आहे. त्याची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
“एका वयानंतर फिजिकल…” रोमान्सबद्दल काय बोलून गेली ६६ वर्षीय नीना गुप्ता; फुटणार का नवा वाद?
भारतामध्ये असे अनेक स्टार क्रिकेट खेळाडू आहेत, ज्यांचे बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत सुत जुळलं आहे. त्यातील एक कपल म्हणजे, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली… विराट आणि अनुष्काने डिसेंबर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. या कपलला दोन गोंडस मुलंही आहेत. विरुष्काच्या लग्नाच्या ८ वर्षांनंतर सध्या सोशल मीडियावर विराटच्या जुन्या क्रशची जोरदार चर्चा होत आहे. अनुष्का शर्माच्या आधी विराटचे हृदय दुसऱ्याच एका बॉलिवूड अभिनेत्रीसाठी धडधडत होतं. ही दुसरी तिसरी कोणी नसून ती महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची सुनबाई आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया देशमुख आहे. रितेश- जेनेलिया हे स्टार कपलपैकी एक आहे.
Ahmedabad Plane Crash नंतर सना मकबुल आली एअर इंडियाच्या समर्थनार्थ, फ्लाइटमधून लिहिली पोस्ट
विराट कोहली जेनिलिया डिसूझावर भाळलेला, हे आम्ही नाहीतर स्वतः विराट कोहलीनं एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. सध्या सोशल मीडियावर त्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या मुलाखतीमध्ये विराट कोहलीनं स्वतः याबाबतचा खुलासा केला होता. मुलाखतीत विराट कोहलीला विचारण्यात आलं की, तुझं पहिलं क्रश कोण ? तुला कोणत्या अभिनेत्रीला क्रिकेट खेळताना पाहायला आवडेल? पण विराटने दिलेल्या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच्या उत्तराने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. विराटने मनामध्ये संकोच न बाळगता आणि मनामध्ये कोणताही विचार न आणता थेट जेनेलिया डिसोझाचं नाव सांगून दिलं. त्याच्या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
‘आमिर खानने अखेर करून दाखवले…,’ ‘Sitaare Zameen Par’ पाहून चाहते भावुक!
विराट कोहलीने एम टिव्हीसाठी अनुषा दांडेकरला ही मुलाखत दिली होती. “जेनेलिया खूपच क्यूट आहे…”, असं विराट मुलाखती दरम्यान म्हणाला. पण असं असलं तरीही दोघांनीही आपआपले वेगवेगळे संसार थाटले आहेत. जेनिलियाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि बॉलिवूड स्टार रितेश देशमुखसोबत २०१२ मध्ये आपली लग्नगाठ बांधली. तर, २०१७ मध्ये विराटनं अनुष्काशी लग्न केलं.