(फोटो सौजन्य - x अकाउंट)
‘पंचायत’ वेबसीरीजमधील मंजू देवी अर्थात बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सध्या चर्चेत आहे. लवकरच ‘पंचायत’ वेबसीरीजचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासोबतच अभिनेत्री नीना गुप्ता ‘मेट्रो इन दिनों’ या चित्रपटामुळे देखील चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान नीना गुप्ताने मुलाखत दिली आहे. त्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने आपले विचार उघडपणे व्यक्त केलेले आहेत. मुलाखतीदरम्यान अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या खासगी आयुष्याबद्दल उघडपणे व्यक्त झाल्या आहेत. एका मुलाखतीत अभिनेत्रीने इंटिमेट सीन्सवर भाष्य केले आहे.
Ahmedabad Plane Crash नंतर सना मकबुल आली एअर इंडियाच्या समर्थनार्थ, फ्लाइटमधून लिहिली पोस्ट
नीना गुप्ता यांनी वयाच्या ४९ व्या वर्षी दिल्लीतील गृहस्थ विवेक मेहरा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. अलीकडेच, ‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली. प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीला प्रेम आणि इंटिमेटसीची इच्छा असते, असं अभिनेत्री मुलाखतीमध्ये म्हणाली. “विशेषत: महिलावर्ग आपल्या वयासोबतच आपली ओळखही विसरताना दिसत आहेत, कारण की, त्या आई आणि गृहिणीच्या रुपात एक नवी भूमिका साकारत असतात. परंतु, या सर्वांमध्ये त्या आपली इच्छा आणि ओळख मागे सोडताना दिसत आहेत. ” नीना यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की, ही प्रवृत्ती लोकांच्या किती खोलवर रुजलेली आहे.
‘आमिर खानने अखेर करून दाखवले…,’ ‘Sitaare Zameen Par’ पाहून चाहते भावुक!
जी महिलांना सामाजिक अपेक्षांच्या माध्यमातून काही गोष्टी सोडून देण्यासाठी मजबूर केले जाते. परंतु, याचा अर्थ असा नाही की, ती गोष्ट वास्तवातही करावी किंवा करावी लागेल. नीना गुप्ता मुलाखती दरम्यान पुढे म्हणाल्या की, “७० ते ८० वयोगटातल्या महिला रोमान्स करीत नाहीत, असा विचार केव्हाही करु नका. विशेषत: भारतीय महिला हा विचार करतात की, बस्स आता पुरे झालं. परंतु, मी आता पाहते की, अनेक ५० च्या वयोगटातल्या किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातल्या महिला जीमला जातात. त्यांना फिट अँड फाईन राहायचंय. इच्छा प्रत्येकात असायला हवी, स्वप्न कोण पाहत नाही ? जर ऑनस्क्रिन केमिस्ट्रीबद्दल बोलायचं तर, एखादा दिग्दर्शक जुन्या कलाकारांमधील प्रेमसंबंध नैसर्गिक पद्धतीने दाखवत असेल, तर त्यामध्ये काहीच हरकत नाही. वयोमानानुसार प्रेम संपतं का?”
‘कुबेरा’ चित्रपटाने जिंकले प्रेक्षकांचं मन, धनुषच्या अभिनयावर चाहत्यांचा प्रेमाचा वर्षाव
नीना गुप्ता सध्या ‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अलीकडेच, माध्यमांसोबत संवाद साधत असताना अभिनेत्री म्हणाल्या की, “तुम्हाला बोलवतात तर खरं… पण तुम्हाला कोणीही कुठलेही प्रश्न विचारत नाहीत. मोठ- मोठ्या चित्रपटांमध्ये तुम्हाला बोलावलं जातं आणि मग असं होतं की, जेव्हा तुम्ही मुलाखत संपवता, त्यावेळी फोटोग्राफर्स तुमच्या पेक्षा इतर लोकप्रिय कलाकारांकडे धावत पळत, कधी कधी तर आपल्यालाही धक्का देत त्यांच्याकडे जातात. त्यामुळे मी अशा ठिकाणी जात नाही. कारण, मला माहिती आहे की, आपल्याला धक्का देऊन ते इतरांचे फोटो काढायला जातील.”