‘विशू’हा चित्रपट शुक्रवारी (८ एप्रिल) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात वाढलेल्या विशूची आणि मुंबईतील करियर कॅान्शस मुलीची प्रेमकहाणी यामध्ये दाखवण्यात आली आहे. ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना चागंली वागणुक न दिल्यानं सतत जॅाब सोडणारा अस्थिर मनाचा विशू अभिनेता गश्मीर महाजनीनं उकृष्टरित्या साकारला आहे. आणि त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारी त्याची बॅास आरवी या सशक्त मुलीची भुमिका अभिनेत्री मृण्मयी गोडबोलनं केली आहे.
कोकणातील निसर्गरम्य वातावरणात वाढलेल्या विश्वनाश मालवणकर उर्फ विशू आणि आरवी यांची प्रेमकहाणी दाखवणारा हा चित्रपट. ऑफिसमध्ये काम करताना वरिष्ठाकडून दिली जाणारी वागणूक याविरोधात कायम बंड करणारा हा विशू. ऑफिसमध्ये काम करताना बॅास आर्वीच्या प्रेमात पडतो आणि तिच्याजवळ ते व्यक्तही करतो. मात्र त्यामुळे विशू स्व:ताहून तो सुद्धा जॅाब सोडून जातो. मात्र त्याच्या जाण्यानं ऑफिसमधले त्याचे सहकारी त्याला जॅाबवर परत घेण्यासाठी सोशल मिडियावर मोहिम चालवतात. त्यामुळे स्व:ताहून जॅाब सोडून गेल्याबद्दल त्याच्याकडून एनओसी आणण्यासाठी आरवी त्याच्या शोधात कोकणात जाते. तिथं जाऊन ती कोकणाच्या आणि विशूच्याही प्रेमात पडते. मग त्याच्याकडून ते एनओसी आणण्यासाठी तिची चाललेली धडपड आणि त्याचवेळी तिच्या मनात त्याच्याविषयी निर्माण होणारी ओढ यामध्ये होणारी तिची घालमेल दाखवण्यात आली आहे. तर, विशूसोबत असलेली त्याच्या मित्रांची केमेस्ट्री, त्यांच्यातील विनोदी संवाद सिनेमागृहात आंनदी वातावरण तयार करतं.‘ये मालवण कहा आया? असं मुलाखती दरम्यान विचारल्यावर ‘विशू’ म्हणतो, यहा दिल में…या एका डायलॉगनं कोकणवासीयांसह अनेकांची तो मनं जिंकतो. विशू आणि आरवीच्याभोवती फिरणारी कथा अचानक वळण घेते ती विशूच्या अस्तिवाच्या प्रश्नावर. खरंच विशू हा कोण आहे. त्याची ओळख काय हा प्रश्न चित्रपटाच्या शेवटीच्या १० मीनटाच्या सीनमध्ये येतो. तेव्हा चित्रपटाचं कथानक कुठंतरी हरवलेलं आहे असं वाटतं. विशू आणि आरवीच्या लव्ह स्टोरीच्या हॅपी एडिंगची अपेक्षा करणाऱ्या प्रेक्षकांचा मात्र हिरमोड होतो. विशू आणि आरवीच्या प्रेमातकहाणीत पुर्ण चित्रपटात उल्लेखही नसणाऱ्या विशुच्या वडील हेच त्याने सोडलेल्या कंपनीचे सीईओ असणं आणि त्याच्य मृत्यूपश्चात त्यांची संपत्ती त्याच्या आईच्या नावे करणं हे काही प्रेक्षकांच्या पचणी पडलेलं नाही.
श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केलं आहे. या चित्रपटात गश्मीर आणि मृण्मयी गोडबोले यांच्याव्यतिरिक्त ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकरही प्रमुख भूमिकेत आहेत. मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘रे मना’ या गाण्याला नेहा राजपाल हीचा सुमधुर आवाज लाभला आहे. तर ह्रषिकेश कामेरकर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याचे बोल अतिशय सुंदर असून प्रेमाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देतात. तर, कोकणातील यात्रेवर चित्रीत करण्यात आलेल गाणं प्रत्येक कोकणवासीला त्याच्या गावाची आठवण करून देतं. कोकणचं निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसं, प्राचीन मंदिरं, तिथली संस्कृती, परंपरा या सगळ्याचंच लोकांना आकर्षण असतं आणि या चित्रपटाचं काही चित्रीकरण कोकणातील अशाच एका बेटावर करण्यात आलंय. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण त्याल असलेला ग्रामीण टच फार सुरेख पध्दचतीनं दिग्दर्शाकानं मांडलंय.
कोकणातला सुंदर लोकेशन्स ही चित्रपटाची जमेची बाजू. तिथल्या लोकेशन्सचा अतिशय योग्य वापर करण्यात आला आहे. चित्रपटाच्या निमित्ताने मालवणचे निसर्गसौंदर्यं प्रेक्षकांसमोर आलंय. समुद्रकिनाऱ्याचे ड्रोन कॅमेऱ्याने केलेलं शूटींग पाहताना खरोखरचं आपल्याला कोकणात असल्याचा फिल येतो. कोकणातील ग्रामिण भागातील लग्न त्यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. सुरुवातीला संथगतीने चालणारी चित्रपटाची कथा मध्यानंतर कोकणातल्या लोकेशन्स आणि त्यांच्या फुलत जाणाऱ्या प्रेमकहाणीनं प्रेक्षकांना खिळवून ठेवते. त्यात गश्मीर आणि मृण्मयीचा अभिनय उत्तम आहे. समुद्राच्या सहवात सहवासात फुलत जाणारी त्यांची प्रेमकहाणीचं हॅपी एडिंग होतं की त्याच्यांच दुरावा कायम राहतो यासाठी हा चित्रपट नक्की पाहावा.