'स्वदेस'च्या सेटवर शुटिंग दरम्यान शाहरुख खानचा झालेला अपघात, चित्रपटातील अभिनेत्याने सांगितला किस्सा; म्हणाला "आशुतोष चिडला पण..."
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा २००४ साली प्रदर्शित झालेला ‘स्वदेस’ चित्रपट आजही सुपर डुपर हिट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारिकर यांनी केले आहे. तब्बल २१ वर्षांनंतर चित्रपटाच्या सेटवरील काही गंमती- जंमती अभिनेता दया शंकर पांडेने शेअर केलेल्या आहेत. शुटिंग म्हटल्यानंतर अनेक चांगल्या- वाईट गोष्टी घडत असतात, त्याच गोष्टी अभिनेत्याने मुलाखतीदरम्यान शेअर केल्या आहेत.
विराट कोहलीने अनब्लॉक करताच राहुल वैद्यचे सूर बदलले, ‘जोकर’ म्हटल्यानंतर आता कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
फ्रायडे टॉकीजला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेता दया शंकर पांडेने सांगितलं की, “माझा आणि शाहरुख खानचा ‘स्वदेस’ चित्रपटामध्ये एक सीन आहे. त्या सीनमध्ये मी शाहरुखला माझा मित्र म्हणून त्याला माझं गाव दाखवत असतो आणि त्या गावातल्या गोष्टींचीही त्याला माहिती देत असतो. मी बाईक चालवत असतो आणि माझ्या पाठी शाहरुख बसलेला असतो. शुटिंगच्यावेळी सेटवर दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर खूपच स्ट्रिक्ट वागतात. त्यामुळे त्यांना मी तेव्हा सांगितलं होतं की, ‘मला बाईक चालवायला येत नाही, मी गेल्या कित्येक दिवसांपासून बाईक चालवली सुद्धा नाहीये.’ ”
जिया खान प्रकरणावर सूरज पांचोलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, थेट आरोपांचाच पाढा वाचला
पुढे दया शंकर पांडेने मुलाखती दरम्यान सांगितले की, “त्यामुळे आपण या सीनमध्ये शाहरुख खानला बाईक चालवायला दिली आणि मी मागे बसलो तर चालेल का? असा मी प्रश्न दिग्दर्शकांना विचारला. यावर त्यांनी तो या गावात नवीन आहे, त्यामुळे तू त्याला आपल्या गावातला परिसर दाखवत आहेस. म्हणून तुलाच बाईक चालवावी लागेल असं त्यांनी मला सांगितलं.” शुटिंग दरम्यानचा किस्सा शेअर करताना अभिनेत्याने सांगितला की, “दिग्दर्शकांनी मलाच बाईक चालवायला सांगितल्यानंतर मग शेवटी मी त्या गावातील परिसरातील सीनसाठी बाईक चालवण्याचा सराव करत होतो.
स्वत: ला WhatsApp ला पाठवला मेसेज अन् संपवलं जीवन, प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शकानं केली आत्महत्या
“चित्रपटात शाहरुख युएस रिटर्न दाखवला आहे. त्याला गावाबद्दल काहीही माहिती नसतं. त्यामुळे मी शाहरुखला संपूर्ण गावची माहिती देत असतो. दिग्दर्शक सेटवर हिटलर सारखेच असतात. मी जेव्हा बाईक चालवण्याची प्रॅक्टिस करत होतो, त्यावेळी शाहरुख समोरच बसलेला होता. त्याने मला आवाज दिला आणि विचारलं, ‘तुला चालवता येईल ना,’ मी ‘हो’ म्हटलं. मग त्याने मला बाईकवरून एक राइड द्यायला सांगितली. तेव्हा, मी बाईक सुरू केली आणि माझा तोल गेला आणि आम्ही पडलो. तेव्हा शाहरुख खान आधीच पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. त्यात माझ्यामुळे तो पडला, यानंतर सेटवर सगळं वातावरण बदललं.” असा किस्सा अभिनेत्याने सांगितला.
Kartik Aaryan च्या आनंदाला नाही उरला पारावार, खास क्षणांचे फोटो शेअर करत म्हणाला…
“माझ्यामुळे शाहरुख पडल्यामुळे मी खूप घाबरलो होतो. त्यामुळे मी त्याला हात पुढे करूनही मदत करू शकलो नाही. पण, नंतर तोच त्याचा स्वत: उठला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून कानात म्हणाला, ‘मला माहित होतं की, तुला बाईक चालवता येत नाही.’ त्यानंतर त्याने आशुतोष यांना शॉट घेऊयात असं सांगितलं. त्यावेळी दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर माझ्याकडे रागाने बघत होते. म्हणून शाहरुख त्यांना म्हणाला, ‘त्याच्याकडे बघू नका, चूक माझी होती, माझा तोल गेला.’ त्यामुळे शाहरुख खानच्या या कृतीने मी भारावून गेलो.”