Virat Kohli Unblock Rahul Vaidya Singer Call Good Human Being To Cricketer Earlier Lashed Out Him
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि त्याच्या चाहत्यांवर टीका केल्यामुळे ‘बिग बॉस’ फेम गायक राहुल वैद्य सध्या कमालीचा चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राहुलने सोशल मीडियावर विराटचा उल्लेख करत शेअर केलेल्या स्टोरीमध्ये असे लिहिले होते की, ‘विराट कोहलीचे चाहते विराटपेक्षाही मोठे जोकर आहेत.’ याशिवाय त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत विराटने त्याला ब्लॉक केल्याचे सांगितले होते. आता त्याने पुन्हा एकदा त्याने विराटशी संबंधित एक पोस्ट शेअर केली, यावेळी मात्र त्याने विराटचे कौतुक केले आहे. त्याच्यामुळे राहुल आणि विराटमधला वाद मिटला असल्याची चर्चा आहे.
जिया खान प्रकरणावर सूरज पांचोलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, थेट आरोपांचाच पाढा वाचला
दरम्यान, काही तासांपूर्वीच राहुलने विराटसंबंधित एक खास पोस्ट शेअर केली आहे. विराटसंबंधित शेअर केलेल्या पोस्टमध्ये राहुल म्हणतो, “अनब्लॉक केल्याबद्दल मी विराट कोहलीचे आभार मानतो. तू क्रिकेटमधल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी आहेस, तू भारताचा अभिमान आहेस! जयहिंद. देव तुला आणि तुझ्या कुटुंबियांना आशिर्वाद देवो. काही मुर्ख लोकांनी माझ्यासहित माझ्या पत्नीला आणि माझ्या बहिणीलाही शिवीगाळ केलीये. तर काहींनी माझ्या मुलीच्या फोटोला मॉर्फही केलं आहे. मला आणि माझ्या प्रियजनांनाही अनेक शिव्या पाठवल्या आणि अजूनही ते ह्याच गोष्टी करताना दिसत आहेत, देव त्यांना सद्बुद्धी देवो. मी तुमच्याबद्दलही वाईट बोलू शकतो, पण मी लिहिणार नाही. कारण यामुळे नकारात्मकता वाढेल, ज्यामुळे काहीही साध्य होणार नाही.”
स्वत: ला WhatsApp ला पाठवला मेसेज अन् संपवलं जीवन, प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शकानं केली आत्महत्या
पोस्टच्या शेवटच्या भागात, राहुलने विराटचा भाऊ विकासला उद्देशून लिहिलंय की, “विकास कोहली भाई, तुम्ही मला जे काही म्हटले त्यावरुन मला वाईट वाटत नाही. कारण मला माहितेय तू खूप चांगली व्यक्ती आहेस. मॅन्चेस्टर किंवा ओव्हल स्टेडियमच्या बाहेर झालेली आपली भेट आणि तू माझ्या गाण्याबद्दल मला सांगितलेल्या चांगल्या गोष्टी मला आठवत आहेत.” असं म्हणत विकास कोहलीचं राहुलने कौतुक केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच राहुलने विराटविषयी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये क्रिकेटपटूवर उपहासात्मक टीका केली होती. विराटवर टीका करताना राहुल म्हणालेला की, “सर्वांना माहितीचेय की, विराटने मला ब्लॉक केलं आहे. तो सुद्धा इन्स्टाग्रामचा ग्लिच असेल, त्याने मला ब्लॉक केलं नसेल.” इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदमने विराटला सांगितलं असेल की, “मी तुझ्या वतीने राहुल वैद्यला ब्लॉक करतो.”
अल्गोरिदमबद्दल राहुल बोलण्याचे कारण म्हणजे, राहुलच्या या वक्तव्याच्या काही दिवसांपूर्वी विराटच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन अभिनेत्री अवनीत कौरच्या फॅन पेजवरील एक फोटो लाइक करण्यात आलेला, तो तातडीने अनलाईकही करण्यात आला. ३० एप्रिल रोजी लाईक-अनलाईकची बाब प्रेक्षकांच्या लक्षात आली. त्यानंतर २ मे रोजी विराटने अभिनेत्रीचा उल्लेख न करता एक पोस्ट शेअर केलेली, ज्यामध्ये त्याने घडलेल्या घटनेला ‘अल्गोरिदम ग्लिच’ म्हटलेले.
त्यावरुनच राहुलने विराटला टोमणा मारला होता. त्यानंतर काही पोस्ट शेअर करत पापाराझींसोबत बोलताना राहुलने विराटला लक्ष्य केले होते. त्याचे असे म्हणणे होते की, विराटने त्याला का ब्लॉक केले आहे. यावरुन विराटच्या चाहत्यांनी राहुलला प्रचंड ट्रोल केले होते. पापाराझींनीही राहुलला असे म्हटलेले की, विराटकडे त्याला ब्लॉक करण्यासाठी वेळही नाहीये.