फोटो सौजन्य - Social Media
बॉक्स ऑफिसवर सध्या खूप मोठे युद्ध चालू असण्याचा भास होत आहे. कारण सैय्याराने भारतात एक लाट आणलेली असल्याचे समोर तर आलेच आहे. पण त्यानंतर ‘महावतार नरसिम्हा’ या सिनेमाच्या एन्ट्रीने चाहत्यांचा प्रतिसाद जरा या सिनेम्याकडे वळल्याचेही दिसून आले होते. अशामध्ये १ ऑगस्ट रोजी अभिनेता अजय देवगणचा सिनेमा ‘सन ऑफ सरदार २’ आणि ‘धडक २’ यांनी एंट्री घेतली आहे. पण त्यांचा परफॉर्मन्स कसा होता? चला तर मग जाणून घेऊयात:
‘सन ऑफ सरदार २’ हा सिनेमा १ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर आला असून पहिल्याच दिवशी त्याने फार गंभीर कामगिरी केली आहे. १३ वर्षांपूर्वी रिलीज झालेला सिनेमा ‘सन ऑफ सरदार’ने पहिल्याच दिवशी १०.८० लाखांची कमाई केली होती. तर ‘सन ऑफ सरदार २’ने पहिल्या दिवशी फक्त 6.75 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन करून अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे.
‘धडक २’ सिनेमा तयार करण्यासाठी ६० कोटींचा बजेट होता. या सिनेमाने अतिशय निराशाजनक कामगिरी केली असून, ‘सन ऑफ सरदार २’ ने या सिनेमाला मागे सोडले आहे. फक्त ३.३५ कोटींची कमाई ‘धडक २’ ने केली असून फक्त 22.85% सीट्सच भरल्या गेल्या होत्या. ‘धडक’ पेक्षा ‘धडक २’ चा परफॉर्मन्स फार कमी आहे.
‘महाअवतार नरसिम्हा’ने उत्तम कामगिरी केली आहे. सिनेमा ५ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून हिंदी भाषेत 38.20 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर सर्व भाषांचे मिळून एकूण 51.75 कोटींचे कलेक्शन केले आहे. या सिनेमाने यंदाची ब्लॉकबस्टर मुव्ही ‘सैय्यारा’ला शुक्रवारी चांगलाच झटका दिला होता. या सिनेमाने शुक्रवारी एकूण 7.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. जे सैय्यारा पेक्षा 5.80 कोटी रुपयांनी जास्त होते.
एकंदरीत, बॉक्स ऑफिसवर ‘सैय्यारा’चा पगडा भारी आहे पण त्याला उत्तम स्पर्धक म्हणून ‘महाअवतार नरसिम्हा’ लाभला आहे. ‘सन ऑफ सरदार २’ने जरी ‘धडक २’ ला मागे टाकले असले तरी इतर दोन सिनेमांचा परफॉर्मन्स त्यांच्या तुलनेत फारच तगडा आहे.