एसएस राजामौली यांचा मोस्ट अवेटेड आरआरआर (RRR) २५ मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात रामचरण, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. त्याचवेळी चित्रपटाचा मॉर्निंग शो पाहण्यासाठी गेलेल्या एका चाहत्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
मित्राने त्याला दवाखान्यात नेले मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओबुलेसू असे या चाहत्याचे नाव असून त्याचे वय 30 वर्षे आहे. ओबुलेसू आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील एसव्ही मॅक्समध्ये चित्रपट पाहत होते. पण बराच वेळ त्याच्या शरीरात हालचाल होत नव्हती. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले जेथे डॉक्टरांनी ओबुलेसूला मृत घोषित केले.
[read_also content=”अभिनेत्री लारा दत्ताला कोरोनाची लागण, मुंबई पालिकेकडून घर सील करत कंटेन्मेंट झोनची घोषणा https://www.navarashtra.com/movies/actress-lara-dutta-found-corona-positive-nrsr-259822.html”]
ज्या चित्रपटांनी 800 कोटींहून अधिक कमाई केली आहे या चित्रपटाला १०० कोटींहून अधिकची ओपनिंग मिळू शकते, असे ट्रेड एक्सपर्टचे मत आहे. RRR ने प्री-रिलीज कमाईमध्येही अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. वितरण, उपग्रह, संगीत यांसारख्या हक्कांची विक्री करून या चित्रपटाने रिलीजपूर्वीच सुमारे 800 कोटींची कमाई केली आहे.
[read_also content=”वडिलांना न्याय मिळावा म्हणून मुलाने सोडले प्राण, आरटीआय कार्यकर्त्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळेना, १४ वर्षांच्या मुलाने आत्मदहन करीत तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी https://www.navarashtra.com/india/boy-dies-after-father-seeks-justice-rti-activists-killers-go-unpunished-14-year-old-boy-jumps-from-third-floor-nrdm-259860.html”]