(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )
डान्सर-कोरिओग्राफर धनश्री वर्मा सध्या ‘राइज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहे. या शोमध्ये तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. विशेषतः, क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याच्याशी झालेल्या घटस्फोटाबद्दलही तिने खुलेपणाने भाष्य केलं.
धनश्रीने दावा केला की, लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच तिने चहलला फसवताना पकडलं होतं. तिच्या म्हणण्यानुसार, चहलने तिच्या विश्वासाला तडा दिला होता. या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगल्या. घटस्फोटाचं कारण सांगताना तिने असे म्हटले होते की, वर्षभरातच त्यांचं नातं संपलं होतं. धनश्रीने केलेल्या या आरोपांवर अखेर युजवेंद्र चहलने मौन सोडलं आहे.
क्रिकेटपटूने असे म्हटले की,”मी एक स्पोर्ट्समन आहे आणि मी कधीच चीटिंग करत नाही. जर एखाद्याने दोन महिन्यात फसवणूक केली असती, तर इतके दीर्घकाळ नाते टिकले असते का? माझ्यासाठी हा विषय आता संपला आहे.मला आता काही देणं-घेणं नाही. मी माझ्या आयुष्यात पुढे गेलो आहे आणि इतरांनीही तसंच करायला हवं.” युजवेंद्र चहलच्या या थेट उत्तरानंतर, सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्याच्या आणि धनश्रीच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
‘झुंड’ फेम प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीची निर्घृण हत्या; नागपूर हादरलं
पुढे चहल म्हणाला, कोणीही आजकाल काहीही बोलतं, आणि ते सोशल मीडियावर पसरतं.ही शेवटची वेळ आहे जेव्हा मी यावर बोलतोय. माझ्यासाठी हा विषय संपला आहे. मी यावर यापुढे काही बोलणार नाही. आता मी माझ्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करतो आहे.”
Gautami Patil New Song: ‘सुंदरा’ व ‘कृष्ण मुरारी’ नंतर गौतमी पाटीलच्या ‘सोनचाफा’ गाण्याला भरभरून प्रेम
चहल आणि धनश्री यांची भेट डान्स क्लासच्या निमित्ताने झाली होती. काही काळाच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी २०२० मध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाची त्या वेळी मोठी चर्चा झाली होती.लग्नानंतर अनेकदा दोघांचे एकत्र फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत असत. मात्र, २०२२ पासून दोघं वेगळं राहत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.या चर्चांना अखेर दुजोरा मिळाला आणि मार्च २०२५ मध्ये दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला. त्यानंतर दोघांनीही आपल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.