(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )
‘माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी’ या गाण्याने सध्या सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला आहे. अर्थातच हे धुमाकूळ घालणारं गाणं नृत्यांगना गौतमी पाटीलच आहे. ‘सोनचाफा’ हे गाणं सध्या तुफान गाजतंय. गौतमीच्या मोहक अदा आणि नृत्याने या गाण्याला विशेष वजन आलं. नवरात्रोत्सवात तर या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलं. आणि गौतमीही यंदाच्या नवरात्रीत या गाण्यावर थिरकत साऱ्यांच मन जिंकताना दिसली. यानंतरही हे गाणं साऱ्यांना थिरकायला भाग पाडतंय. गाण्याच्या ओळींनी आणि गौतमीच्या नृत्याने अर्थातच थिरकायला भाग पाडलं आहे. या गाण्यातील गौतमीच्या डान्ससह तिचा लूकही बराच व्हायरल झाला.
‘झुंड’ फेम प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीची निर्घृण हत्या; नागपूर हादरलं
गाणं प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्यावर गौतमी बरेचदा इव्हेंटमध्ये थिरकतानाही दिसली. यावेळी तिचा लूकही अनेकांच्या पसंतीस पडला. याचे अनेक रील व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. ‘साईरत्न एंटरटेनमेंट’ या प्रॉडक्शन हाऊसच्या या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिलेली पाहायला मिळत आहे. हे गाणं निर्माते संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर यांनी निर्मित केलं आहे. दिग्दर्शक अर्चित वरवडे यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. ‘साईरत्न एंटरटेनमेंट’साठी गौतमी पाटीलने ‘सुंदरा’ आणि ‘कृष्ण मुरारी’ ही दोन गाणी केली आहेत. या तिच्या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि आता सोनचाफालाही भरपूर प्रेम दिलं.
फसवणूक प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या वाढल्या अडचणी, परदेशात जाण्यास न्यायालयाने दिला नकार
संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत केलेलं हे गाणं गायिका मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरबद्ध केलं आहे. तर गाण्याचे बोल वैभव देशमुख यांनी लिहिले आहे. सध्या गौतमीच ‘सोनचाफा’ हे गाणं साऱ्यांच्या पसंतीस पडत असून यावर अनेकजण थिरकताना दिसत आहेत.
गौतमी पाटील हिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका अपघाताप्रकरणी पोलिसांनी तिला नोटीस बजावली आहे. वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला एका वाहनाने धडक दिली होती. ते वाहन गौतीमी पाटील हिच्या नावावर असल्याने पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी असून सामाजी विठ्ठल मरगळे असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका भरधाव वाहनाने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी 30 वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे.