Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘झॉलीवूड’मध्ये झळकणार झाडीपट्टीचे १३० कलाकार, चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. त्यामुळे 'झॉलीवूड'मधून पहिल्यांदाच झाडीपट्टी चित्रपटाच्या रुपात जगभरात पोहोचणार आहे.

  • By Aparna Kad
Updated On: May 10, 2022 | 12:33 PM
‘झॉलीवूड’मध्ये झळकणार झाडीपट्टीचे १३० कलाकार, चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Follow Us
Close
Follow Us:

बऱ्याच राष्ट्रीय-आंतररष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला, पुरस्कारप्राप्त ‘झॉलीवूड’ हा चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित होत आहे. झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे झाडीपट्टीवरचे खरेखुरे कलाकार आणि यापूर्वी कधीच अभिनय न केलेले सर्वसामान्य लोक चित्रपटांतील भूमिकांमध्ये दिसतील.

विशबेरी फिल्म्सच्या प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे, शाश्वत सिंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून अमित मसूरकर आणि डयुक्स फार्मिंग फिल्म्स चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत तर न्यूटन, शेरनी, सुलेमानी किडा असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले अमित मसूरकर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आणि प्रस्तुतकर्ते आहेत. हा चित्रपट नव्या दमाचा दिग्दर्शक तृषांत इंगळेनं दिग्दर्शित केला आहे.

विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. त्यामुळे ‘झॉलीवूड’मधून पहिल्यांदाच झाडीपट्टी चित्रपटाच्या रुपात जगभरात पोहोचणार आहे. हा चित्रपट बऱ्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखवला गेला आहे. राज्य पुरस्कारांमध्येही या चित्रपटानं नामांकनं मिळवली आहेत.

कलाकार निवडीविषयी तृषांत सांगतो, चित्रपटातील भूमिकांसाठी अस्सल दिसणारे, तिथली भाषा बोलणारे कलाकार हवे होते. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील होतो. व्यावसायिक कलाकार निवडल्यास त्यांचं दिसणं, त्यांची भाषा, त्यांचा लहेजा अशा गोष्टी खऱ्याखुऱ्या वाटण्यासाठी त्यांच्यावर खूप काम करावं लागतं. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. पण नॉन अॅक्टर्स घेतल्यास किंवा झाडीपट्टीवरचेच कलाकार घेतल्यास त्यांचं निरागस असणं, अस्सल दिसणं, बोलणं चित्रपटाला अधिक उपयुक्त ठरेल हा विचार होता. त्यामुळे राहुल गावंडे आणि सौरभ हिरकणे या आमच्या कास्टिंग दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ऑडिशन्स घेतल्या. त्यातून पाच-साडेपाचशे लोकांची निवड केली. त्यातील काही झाडीपट्टीवरचेही कलाकार होते. त्यातून आणखी चाळणी लावून अंतिम निवड केली. ज्या गावात चित्रीकरण करायचं होतं, त्या गावातलेही कलाकार निवडले. चित्रीकरणावेळी सुरुवातीला कॅमेऱ्यासमोर सर्वजण लाजत होते, बावरत होते. पण या सर्वांनीच अप्रतिम अभिनय केला आहे. त्यांचा अभिनय हा अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट अस्सल झाडीपट्टीचा अनुभव देईल.

Web Title: Zollywood new marathi movie 130 zadipatti artist will act in movie nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2022 | 09:30 AM

Topics:  

  • marathi entertainment
  • Marathi Entertainment News

संबंधित बातम्या

‘क्रांतीज्योती विद्यालय’ मराठी प्रेक्षकांनी भरली! पहिल्या आठवड्यातच बजेटपेक्षा तिप्पट कमाई
1

‘क्रांतीज्योती विद्यालय’ मराठी प्रेक्षकांनी भरली! पहिल्या आठवड्यातच बजेटपेक्षा तिप्पट कमाई

रणपती शिवराय चित्रपटातून चिन्मय मांडलेकरची एक्झिट! ‘या’ कारणामुळे शिवरायांची भूमिका करण्यास दिला नकार
2

रणपती शिवराय चित्रपटातून चिन्मय मांडलेकरची एक्झिट! ‘या’ कारणामुळे शिवरायांची भूमिका करण्यास दिला नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.