लोणावळा : भाविकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. उद्यापासून नवरात्रौउत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळं भाविकांमध्ये उत्साहाचे चैतन्याचे वातावरण आहे. कारण कोरोनाच्या (Corona) दोन वर्षानंतर कोणतेही निर्बंध न पाळता आपण यावर्षी नवरात्रौउत्सव साजरा (Navratri festival) करणार आहोत. दंहीहंडी, गणेशोत्सव (Danhihandi, Ganeshotsav) हे सण कोरोनाच्या दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. त्यानंतर आता नवरात्रौउत्सव सण उद्यापासून सुरु होत आहे. उद्या घटस्थापना आहे. त्यानंतर नऊ दिवस हा सण चालणार आहे. या सणात राज्यातील प्रसिद्ध देवींची मंदिर आहेत, तिथे भाविक दर्शनासाठी जातात. लोणावळ्यातील (Lonavla) एकविरा देवीचे मंदिर (Ekvira devi mandir) हे त्यापैकी प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या उत्साहात नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. त्यामुळं मंदिर ट्रस्टीनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
[read_also content=”उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, चर्चांना उधाण https://www.navarashtra.com/maharashtra/businessmen-mukesh-ambani-meet-to-cm-eknath-shinde-329638.html”]
दरम्यान, कोरोनाच्या दोन वर्षानंतर नवरात्रौउत्सव साजरा होणार असल्यामुळं या नऊ दिवस एकविरा देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी चोवीस तास खुले राहणार आहे. कारण राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळं नऊ दिवस येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. भाविकांची संख्या विचारात घेता मंदिर ट्रस्टीनं भाविकांसाठी देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिर चोवीस तास खुले ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळं भाविकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे.