Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवरात्र विशेष: सहावी माळ- आजचा रंग राखाडी; जाणून घ्या या रंगाचं महत्त्व

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 01, 2022 | 09:15 AM
नवरात्र विशेष: सहावी माळ- आजचा रंग राखाडी; जाणून घ्या या रंगाचं महत्त्व
Follow Us
Close
Follow Us:

आजचा रंग आहे ग्रे, म्हणजे राखाडी किंवा करडा… हा परिपक्वतेचा रंग आहे…

“Gray Matter” refers to smarts, intelligence, brains, and intellect.. मानवी मेंदूचा रंग आहे हा….
अशाचं काही बुद्धिमान स्त्रिया ज्या हा समाज घडवतात त्यांचा आज जागर करुयात….

प्रत्येकच काळात अनेक स्त्रियांनी त्या वेळची समाजबंधने झुगारुन देऊन काळाच्या पाटीवर आपले नाव कोरले. अगदी गार्गी, मैत्रेयी पासून ते जिजाऊ, राणी लक्ष्मी बाई ते सावित्री बाई ते मदर तेरेसा अगणित नाव आहेत ज्यांची महती समाजाने मान्य केली.

परंतु त्यांचा मार्ग इतका सोपा कधीच नव्हता. पोलादी स्त्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गारेट थॅचर म्हणतात, घर चालवायचं म्हणजे कोणत्या अडचणींचा सामना करायचा हे ज्या गृहिणाला कळू शकतं तिलाच देशासमोरील समस्या कशा सोडवाव्यात हे समजू शकतं.

सुशिक्षित, बुद्धिवान, चांगले कमावणार्‍या स्त्रियांना जगात, कुटुंबात, समाजात जास्त टीकेला तोंड द्यावे लागते हे उघड वास्तव आहे आणि मग त्याला बळी पडून स्वतःला पेलणार नाहीत इतकी अवास्तव उद्दिष्टे समोर ठेवून काम करणार्‍या स्त्रिया ही या जगात कमी नाहीत.

आज शिक्षणाच्या संधीमुळे अनेक स्त्रिया उच्चपदस्थ आहेत तरी पण भारतातील स्त्री शास्त्रज्ञांची संख्या कमीच आहे. मात्र त्यांच्या योगदानाचा दर्जा उच्च आहे. पोषणशास्त्रज्ञ कमला सोहोनी, इलेक्ट्रिकल इंजिनीअर राजेश्वरी चॅटर्जी, रसायनशास्त्रज्ञ असिमा चॅटर्जी, भौतिकशास्त्रज्ञ बिमला बुटी अशा प्रथितयश शास्त्रज्ञ स्त्रियांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले व करवूनही घेतले. हे प्रमाण कमी आहे, यामागे अनेक कारणे आहेत. कुटुंबाने, समाजाने ते समजून घेऊन मदतीचा हात स्त्रीपुढे केला, तर देशातले हे ५० टक्क्य़ांचे बौद्धिक भांडवल, बौद्धिक क्षमता आणि बौद्धिक वैविध्य वापरून देशाच्या प्रगतीत अधिक मोलाची भर पडू शकते. कुटुंबाने, संस्थेने, समाजाने काही गोष्टी समजून घेतल्या, तर योग्य संधी निर्माण करता येतील. याचा विचार व्हायला हवा.

अमेरिकेत आजकाल पती-पत्नी दोघेही शास्त्रज्ञ असतील तर एकाच ठिकाणी, एकाच शहरात कार्यक्षेत्र असावे यासाठी खास प्रयत्न केले जातात. आयएएस, आयटीएस अथवा बँकेतील अधिकाऱ्यांसाठी शक्य असेल, तर पती-पत्नींना एकत्र/जवळ राहता येईल, असे बघण्याचा नियमच आहे तसा आपल्याकडेही व्हायला हवा.

या सगळ्या प्रतिकुलतेवर मात करत, संशोधनाच्या वेगळ्या वाटा धूंडळणाऱ्या या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा!

भविष्यात या रंगाचं वर्चस्व वाढेल अशी आशा करूयात!!

– रश्मी पांढरे

९८८१३७५०७६

 

Web Title: Navratri special sahvi mal todays color is grey know the importance of this color nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2022 | 09:15 AM

Topics:  

  • navratri day

संबंधित बातम्या

Navratri 2025: शिवनगरी वाराणसीतील माँ कालरात्री मंदिराची अद्भुत कहाणी; जिथे आईने शेकडो वर्षे केली कठोर तपश्चर्या
1

Navratri 2025: शिवनगरी वाराणसीतील माँ कालरात्री मंदिराची अद्भुत कहाणी; जिथे आईने शेकडो वर्षे केली कठोर तपश्चर्या

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये या गोष्टी घरात आणल्यास आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या होतील दूर
2

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये या गोष्टी घरात आणल्यास आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या होतील दूर

26 जूनला सुरु होणार गुप्त नवरात्री, शुभ मुहूर्त काय, पूजेची पद्धत काय? जाणून घ्या…
3

26 जूनला सुरु होणार गुप्त नवरात्री, शुभ मुहूर्त काय, पूजेची पद्धत काय? जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.