मांस, अंडी इत्यादी मांसाहारी पदार्थांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. डॉक्टर बिमल छाजेड यांनी एका प्रतिष्ठित डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, व्हिटॅमिन बी12 ने भरलेल्या या गोष्टींमुळे कोलेस्ट्रॉलही वाढते. त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या रुग्णांनी त्यांचे सेवन करू नये
डॉक्टरांनी सांगितले की ज्यांचे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आहे ते आठवड्यातून एकदा सावधगिरीने अंडी वा मटणाचे सेवन करू शकतात. पण ज्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त आहे त्यांच्यासाठी आठवड्यातून एकदाही मांसाहार करणे हानिकारक ठरू शकते
डॉक्टरांनी पुढे सांगितले की जर शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर तुम्ही शाकाहारी अन्नदेखील खाऊ शकता. शाकाहारी पदार्थांमध्ये चरबी नसते आणि याशिवाय विटामिन बी12 ची कमतरता दूर होते. यासाठी पालक आणि मशरूमसारख्या हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्लाही त्यांनी दिला
तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. कारण खाण्यापिण्याच्या योग्य सवयी ठेवल्या तर शरीर स्वतःच त्याची निर्मिती करते आणि त्यामुळे तुम्हाला त्याची कमतरता जाणवत नाही
डॉक्टरांच्या मते, जे लोक पुरेसे फळे आणि भाज्या खातात त्यांच्या पोटात योग्य प्रमाणात फ्लोरा म्हणजेच निरोगी बॅक्टेरिया असतात. हे निरोगी जीवाणू व्हिटॅमिन बी 12 अर्थात कोबालामिनदेखील स्वतः तयार करतात. त्यांना वेगळ्या कोणत्याही पदार्थांची गरज भासत नाही
व्हिटॅमिन बी 12 ची पूर्तता करण्यासाठी कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या गोष्टींचे सेवन करू नका. कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून, उच्च कोलेस्टेरॉलची स्थिती व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेपेक्षा जास्त धोकादायक असू शकते असे मत डॉक्टरांनी यावेळी व्यक्त केले