Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करावा”; ‘पल्स’ परिषदेच्या बैठकीत CM Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश

ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा बळकट होण्यासाठी परिषदेत वैद्यक क्षेत्रातील गुंतवणूकदारांसोबत करार करण्यात यावेत, असे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 05, 2026 | 06:48 PM
“… ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करावा”; ‘पल्स’ परिषदेच्या बैठकीत CM Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश
Follow Us
Follow Us:

मुंबईत ‘पल्स’ या वैद्यकीय परिषदेचे आयोजन
महाराष्ट्राला वैद्यकीय क्षेत्रात जागतिक ओळख देण्यासाठी प्रयत्न
2900 पेक्षा जास्त मान्यवर सहभागी होणार

मुंबई: वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या ‘पल्स’ या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर, येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या परिषदेत देशातून आणि जगभरातून वैद्यक क्षेत्रातील २९०० पेक्षा जास्त तज्ज्ञ, अभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत.

‘पल्स’ वैद्यकीय परिषदेचे भव्य दिव्य आयोजन करून परिषदेच्या माध्यमातून ‘वेलनेस’ उपचारांचा वैद्यकीय पर्यटनातील ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी परिषद आयोजनाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.

पारंपरिक खर्चिक असलेल्या वैद्यकीय उपचाराऐवजी ‘वेलनेस’ उपचारांकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. ‘वेलनेस’ उपचार पद्धतीत राज्यात मोठ्या प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे आयुषमधील उपचार पद्धतींना ‘वेलनेस’ कडे वळविण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Maharashtra Politics: लाडकी बहीण योजनेबाबत ‘ही’ मोठी मागणी; CM फडणवीस म्हणाले, “अनेक…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक स्टार्टअप कार्यरत आहेत. अधिकाधिक स्टार्टअपला परिषदेत सहभागी करून घ्यावे. जेणेकरून परिषदेमध्ये या क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन संशोधनावर आधारित चर्चांमधून कर्करोगासारख्या आजारांवर सहज, सोपी आणि परवडणारी उपचार पद्धती विकसित करण्यात स्टार्टअपला मदत होईल.वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदार या परिषदेत सहभागी होतील याबाबत दक्षता घ्यावी, त्यांच्या माध्यमातून राज्यात होत असलेल्या ‘बल्क ड्रग पार्क’ मध्ये गुंतवणूक होईल, यासाठी प्रयत्न करावे. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभागांनी नोडल अधिकारी नियुक्त करावेत. सबंधित विभागांनी समन्वयाने काम करीत परिषदेच्या आयोजनातून राज्याला वैद्यकीय क्षेत्रात मोठा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

🔸CM Devendra Fadnavis reviewed the preparations of ‘PULSE’ Global Medical Conference to be held in Mumbai.
CM directed to establish Maharashtra as a brand and a global leader in wellness & medical tourism and bring in more investments in Bulk Drug Parks along with StartUps.… pic.twitter.com/DDkhY0oXoo
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 5, 2026

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा बळकट होण्यासाठी परिषदेत वैद्यक क्षेत्रातील गुंतवणूकदारांसोबत करार करण्यात यावेत. यामधून ग्रामीण भागात आरोग्याच्या दर्जेदार सुविधा निर्माण होतील. मानसिक आजारांवरील नवनवीन उपचार पद्धती, वैद्यकीय पर्यटन विकसित होण्यासाठी परिषदेच्या संधीचा उपयोग करण्यात यावा.

बैठकीस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्रीधर दुबे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुख्यमंत्री यांच्या सल्लागार पूजा मिसाळ, आदी उपस्थित होते.

“हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष….”; CM Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश

अशी असणार परिषद

-परिषदेत प्लेनरी, 360 डिग्री डोम, आदींसह स्टार्टअपसाठी वेगळी दालने असणार आहेत. -तसेच उद्योग क्षेत्रातील नवनवीन संशोधनाची माहिती असणारी दालने असणार आहेत.

-परिषदेत जागतिक आरोग्य संघटना, युनेस्को यांचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी होतील.

-जगातील नामांकित वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचे कुलगुरू आणि संशोधकही परिषदेत सहभाग घेणार आहेत. -भविष्यातील वैद्यकीय शिक्षण, डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, उपचार पद्धतीतील संशोधन या विषयांवर पॅनल चर्चा, कार्यशाळा आणि केस स्टडीज होणार आहेत.

Web Title: Cm devendra fadnavis instructed pulse medical conference create maharashtra brand mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Health News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Malad Khot Dongri SRA Project : २० वर्षांच्या रखडपट्टीने नागरिक संतप्त, शाह हाऊसकॉनला हटवण्याची मागणी
1

Malad Khot Dongri SRA Project : २० वर्षांच्या रखडपट्टीने नागरिक संतप्त, शाह हाऊसकॉनला हटवण्याची मागणी

Malhar Conclave 2026: ‘मल्हार २०२६’ कॉन्क्लेव्हचा दमदार प्रारंभ; प्रेरणा, सामाजिक बदल आणि उद्योजकतेवर विचारमंथन
2

Malhar Conclave 2026: ‘मल्हार २०२६’ कॉन्क्लेव्हचा दमदार प्रारंभ; प्रेरणा, सामाजिक बदल आणि उद्योजकतेवर विचारमंथन

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
3

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Mumbai News: आता ईशान्य मुंबईतील नागरीकांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा, खासदार संजय दिना पाटील यांचा पुढाकार
4

Mumbai News: आता ईशान्य मुंबईतील नागरीकांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा, खासदार संजय दिना पाटील यांचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.