तुमच्या मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी ५ सुपरफूड्सचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करून घेऊ शकता. (फोटो सौजन्य - iStock)
बदामामध्ये व्हिटॅमिन ए सोबत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर असते. यामुळे अनेक आजार बरे होण्यासह मेंदूही तीक्ष्ण होतो
चिया सीड्समध्ये मॅग्नेशियम, मँगनीज आणि कॅल्शियम आढळतात. चिया सीड्सने बद्धकोष्ठतेसह पोटाशी संबंधित आजारांपासून मुक्ती मिळते
तुम्ही जर मांसाहारी असाल अंड्यांचा समावेश करा. अंड्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. तज्ज्ञांच्या मते, रोज अंडी खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि तुमचे आरोग्यही चांगले राहते
ब्रोकोली कच्ची आणि शिजवून दोन्ही खाऊ शकता. यामध्ये फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी असून केस निरोगी राहण्यास मदत मिळते
अक्रोड खाल्ल्याने हार्मोन्सची पातळी कायम राहते. यासोबतच हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते. मेंदू तल्लख करण्यासाठीही याची मदत होते