फोटो सौजन्य: Freepik
खोबरेल तेल नैसर्गिक पद्धतीने काम करते. रोज डोळ्यांखाली खोबरेल तेल लावल्याने काळी वर्तुळे कमी होतात. तसेच ते संपूर्ण चेहऱ्यावर मसाज केल्याने चेहऱ्यावर वेगळीच चमक येते.
अनेकांच्या डोळ्यांखाली सूज येत असते. खोबरेल तेलामुळे या समस्येपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. वास्तविक, नारळाच्या तेलामध्ये अॅंटी-इंफ्लेमेंट्री गुणधर्म असतात, जे डोळ्यांखालील सूज कमी करतात आणि तुम्हाला एक ताजेतवाने लुक देतात.
नारळाच्या तेलात फॅटी ॲसिड असते, जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे चेहऱ्यावर कोरडेपणा येत नाही. तसेच डोळ्यांखाली आणि चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसत नाहीत.
खोबरेल तेल लावल्याने डोळ्यांच्या आजूबाजूच्या जळजळीपासूनही आराम मिळतो. डोळ्यांभोवती लालसरपणा आणि जळजळ होत असेल तर खोबरेल तेल लावायला सुरुवात करा. यामुळे ही समस्या हळूहळू कमी करता येईल.
खोबरेल तेल लावल्याने कोलेजनचे प्रोडक्शन सुधारते. यामुळे त्वचा अधिक मऊ आणि टणक राहते, विशेषतः डोळ्यांखाली खोबरेल तेल लावल्याने सुरकुत्या कमी होतात.