इतिहासातील 5 सर्वात भयानक शोध; ज्यामुळे आजही घाबरतात शास्त्रज्ञ
इजिप्तमध्ये एका अनोख्या ममीचा शोध लावण्यात आला होता जिचे तोंड उघडेच होते जणू ती मारताना किंचाळत होती. ती राजघराण्यातील असल्याचे मानले जाते, परंतु मृत्यूचे कारण अजूनही एक गूढ आहे.
ग्रीसमध्ये समुद्राखालची २००० वर्षे जुनं एक उपकरण सापडले होते जे एका प्रकारचे संगणक असल्याचे सांगितले जाते. ग्रहांच्या हालचाली आणि खगोलीय घटनांची गणना करण्यासाठी त्याचा वापर केला जात असे. यावरूनच प्राचीन ग्रीस किती प्रगत होता हे आपल्याला समजते
डेन्मार्क, जर्मनी आणि आयर्लंडमधील पीट बोग्समध्ये सापडलेले मृतदेह २००० वर्ष जुने अजून ते अजूनही चांगल्या स्थितीत शाबूत आहेत, ज्यात केस, कपडे आणि पोटातील पदार्थ समाविष्ट आहेत.
पारदर्शक किंवा दगडी स्फटिकापासून बनवलेल्या स्फटिक कवट्या मायान किंवा अझ्टेक संस्कृतींशी फार पूर्वीपासून जोडल्या गेल्या आहेत. त्यांना प्राचीन मेसोअमेरिकन संस्कृतींचे गूढ असल्याचे मानले जाते. यांमध्ये काही अलौकिक शक्ती असल्याचा दावा केला जातो जो कोणत्याही कुणालाही आजरापासून बरा करूशकतो.
दक्षिण अमेरिकेतील जिवारो जमाती 'त्सांता' प्रक्रियेद्वारे त्यांच्या शत्रूंचं मुंडक लहान करून ठेवत असत. हे शक्ती आणि सूडाचे प्रतीक होते. या सर्व शोधांमध्ये एक गोष्ट सारखी आहे आणि ती म्हणजे, हे सर्व शोध प्राचीन जग किती गुंतागुंतीचे आणि रहस्यमय होते याचा आपल्याला विचार करायला लावतात