स्वतःला जिवंत शेवपेटीत टाकण्यापासून ते डोळ्यातून दूध काढण्यापर्यंत हे आहेत जगातील सर्वात विचित्र रेकॉर्ड
जगातील सर्वात विचित्र रेकॉर्डमध्ये चीनच्या वेई शेंगचूचे नाव अग्रस्थानी आहे. २०१३ मध्ये स्वतःच्या चेहऱ्यावर सुमारे २१८८ टोचावल्या, ज्यामुळे त्याला नीडल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले
यानंतर यादीत नाव येते झ्डेनेक झहरदकाचे, या व्यक्तीने जिवंतपणी स्वतःला १० दिवस शवपेटीत बंद करण्याचा विक्रम बनवला. यादरम्यान त्याने श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेशन पाईपची मदत घेतली. मुख्य म्हणजे, हा पराक्रम करत असताना त्याला १० दिवस विना काही खातापिता ठेवण्यात आले होते
यांनतर सर्वात विचित्र रेकॉर्ड नावावर घेण्याच्या यादीत शो परफॉर्मर अँड्र्यू स्टॅन्टनने आपले नाव नोंदवले आहे. २०१२ मध्ये त्याने आपल्या नाकातून ३६३ सेमी लांबीचा धातूचा कॉइल काढला जे पाहून सर्वच अवाक् झाले
यानंतर यादीत नाव येते झ्डेनेक झहरदकाचे, या व्यक्तीने जिवंतपणी स्वतःला १० दिवस शवपेटीत बंद करण्याचा विक्रम बनवला. यादरम्यान त्याने श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेशन पाईपची मदत घेतली. मुख्य म्हणजे, हा पराक्रम करत असताना त्याला १० दिवस विना काही खातापिता ठेवण्यात आले होते
तुर्कीच्या इल्कर यिलमाझने डोळ्यांतून दूध काढत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले. यामध्ये त्याने त्याच्या नाकाने दूध उचलले आणि डोळ्यांतून सुमारे ३ मीटरपर्यंत त्याचा स्प्रे मारला