ब्रेन ट्युमर अचानक उद्भवत नाही तर त्याची काही लक्षणे ही आधीपासूनच जाणवतात आणि ही लक्षणे नेमकी कोणती आहेत जाणून घ्या
ब्रेन ट्यूमरचे सर्वात सामान्य आणि सुरुवातीचे लक्षण म्हणजे सतत डोकेदुखी. विशेषतः जर सकाळी उठल्यावर ती तीव्र असेल आणि औषधोपचारानेही आराम मिळत नसेल, तर ती चिंतेची बाब असू शकते
जर तुम्हाला उलट्या किंवा मळमळ होत असेल, विशेषतः सकाळी, तर हे मेंदूवर वाढलेल्या दाबाचे लक्षण असू शकते
मेंदूतील ट्यूमर शरीराचे संतुलन नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या त्या भागावर परिणाम करू शकतात. चालण्यात अचानक अडथळा येणे, तोल जाणे किंवा पडण्याची प्रवृत्ती ही धोकादायक लक्षणे असू शकतात
अंधुक दृष्टी, दुहेरी दृष्टी किंवा एका डोळ्यात दिसण्यात अडचण येणे ही ब्रेन ट्यूमरची लक्षणे असू शकतात. वेळीच तपासणी करून घेणे गरजेचं आहे
जर तुमची श्रवणशक्ती अचानक कमी झाली किंवा तुम्हाला बोलण्यात अडचण येत असेल तर ते हलके घेऊ नका. हे मेंदूच्या संवादाशी संबंधित भागावर परिणाम झाल्याचे लक्षण असू शकते
स्मरणशक्ती आणि विचार करण्याची शक्ती कमी होणे हे लक्षणंही आहे. जर तुम्ही गोष्टी विसरायला सुरुवात केली किंवा विचार करण्यासाठी वेळ काढत असाल तर ते मेंदूच्या कार्यात बिघाड असल्याचे लक्षण असू शकते.