देशाला चिरत अगदी सरळ रेषेत मधोमध बांधण्यात आली आहेत ही ७ अद्भुत मंदिरं! हा फक्त योगायोग की अलौकिक संकेत?
केदारनाथ मंदिर, उत्तराखंड राज्यातील एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महाभारत काळात पांडवांनी येथे पूजा केल्याचे सांगितले जाते. हे मंदिर खूप उंचावर असून ६ महिने हे बर्फाने झाकलेले असते. ज्यामुळे फक्त ६ महिने त्याला भाविकांसाठी खुले केले जाते
श्रीकालहस्ती मंदिर, आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती जिल्ह्यातील श्रीकालहस्ती शहरात आहे. हे मंदिर पंचमहाभूतांपैकी एक, येथे असेलेले शिवलिंग वायू तत्वाचे प्रतिनिधित्व करते आणि येथे भगवान शिवाची वायु लिंगम म्हणून पूजा केली जाते. महाभारताच्या वेळी अर्जुनाने येथे भगवान शिवाची पूजा केल्याचे सांगितले जाते. मंदिरात राहू केतू दोषाची पूजा केली जाते.
एकंबेश्वरनाथ मंदिर तामिळनाडूतील कांचीपुरम येथे वसले असून ते भारतातील पंचभूत स्थळांपैकी एक आहे. धार्मिक मान्यतेनुसार, हेच ते ठिकाण आहे जिथे देवी पार्वतीने संतप्त भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी वाळूपासून शिवलिंग स्थापित करून येथे तपस्या केली होती. या मंदिराची उंची सुमारे २०० फूट आहे.
अरुणाचलेश्वर मंदिर, ज्याला अण्णामलाईयार मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे तमिळनाडू राज्यातील तिरुवन्नमलाई शहरात आहे. हे मंदिर भगवान शिवाचे असून ते अग्नी तत्वाचे प्रतिनिधित्व करते. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येथे दीपम उत्सव साजरा केला जातो, ज्यात मंदिराच्या टेकडीवर एक मोठा दिवा लावला जातो. हा दिवा इतका मोठा आणि प्रज्वलित असतो की दोन-तीन किलोमीटर अंतरावरूनही त्याला सहज पाहता येते
जंबुकेश्वर मंदिर, ज्याला थिरुवनायकल मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे तमिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्ह्यात आहे. हे मंदिर भगवान शिवाचे असून ते जल तत्वाचे प्रतीक मानले जाते. मंदिराची खासियत म्हणजे याच्या गर्भगृहात एक पाण्याचा नैसर्गिक प्रवास आहे जो सतत वाहत असतो. मंदिर सुमारे १८०० वर्षे जुने असल्याचे मानले जाते
थिल्लई नटराज मंदिर तामिळनाडू राज्यातील चिदंबरम शहरात वसले आहे हे मंदिर नटराज, म्हणजे नृत्याचा स्वामी असलेल्या शिवाच्या रूपाला समर्पित आहे. पूर्वी हे ठिकाण थिल्लई म्हणूनही ओळखले जात होते ज्यामुळे या मंदिराला हे नाव पडले
रामेश्वरम मंदिर, ज्याला रामनाथस्वामी मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावर असलेले एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची स्थापना भगवान रामाने त्रेतायुगात समुद्र पार करण्यापूर्वी केली होती.