मृत्यूच्या १ तासाआधी शरीरात दिसून येतात हे ५ संकेत; जाणून घ्या गरुड पुराणातील ते आश्चर्य करणारं रहस्य
गरुड पुराणात असे लिहिले आहे की, मृत्यूच्या काही काळ आधी व्यक्तीला काही संकेत मिळू लागतात. हे नक्की कोणते संकेत आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत
गरुड पुराणानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती मरणार असते तेव्हा त्याला त्याने केलेल्या सर्व चांगल्या, वाईट कृत्यांची आठवण येऊ लागते. इच्छा नसली तरी व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील वाईट कृत्यांचा आठवण रोखता येत नाही
गरुड पुराणात हे देखील सांगितले आहे की, जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्या व्यक्तीला एक रहस्यमयी दरवाजा दिसू लागतो.
एवढंच नाही तर जेव्हा मृत्यू आपल्या जवळ येतो तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या दिशेने यमराजाचे काही दूत येताना दिसू लागतात. त्या व्यक्तीला नेहमीच त्याच्या आसपास नकारात्मक शक्तीची उपस्थिती जाणवू लागते
मृत्यू जवळ आला की, काही दिवस आधी व्यक्तीला आपल्या स्वप्नात त्याचे पूर्वज दिसू लागतात. काही लोकांच्या बाबतीत असंही होत की, त्यांना स्वप्नात त्यांचे पूर्वज रडताना दिसून येतात
शेवटचं संकेत म्हटलं तर जेव्हा व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याच्या हातावरील रेषा अचानक हलक्या होऊ लागतात. गरुड पुराणात असेही लिहिले आहे की, काही लोकांच्या हातावरील रेषा दिसणेही बंद होते