प्राजक्ता माळी नेहमीच क्लासी लुक्स करत असते आणि आता तिने बॅकलेस टॉप आणि लाँग स्कर्टचा हा लुक केला असून खूपच सुंदर दिसत आहे
प्राजक्ताने गुलाबी आणि लाल रंगाचे मिक्स्चर असणारा स्कर्ट आणि लाल रंगाचा बॅकलेस टॉप घातले असून वेगवेगळ्या पोझमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय
प्राजक्ताने यासह केस मोकळे ठेवले आहेत आणि अत्यंत साध्या हेअरस्टाईलमध्येही तिचा लुक अथ्यंत मनमोहक आणि काळजाचा ठाव घेणारा दिसून येतोय
या स्कर्ट टॉपसह प्राजक्ताने कान भरून जाईल असे मोठे टॉप्स घातले आहेत आणि डाव्या हातामध्येदेखील मिस अँड मॅच बांगड्या घातल्या आहेत
प्राजक्ताने नेहमीप्रमाणे या फोटोंमधून आपल्या हास्याने चाहत्यांना घायाळ केले आहे आणि ज्यामुळे चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)