तेजस्विनी लोणारीने समाधान सरवणकरशी दत्त जयंतीचा मुहूर्त साधून लग्नगाठ बांधली आहे. तेजस्विनीचा लुक पाहून चाहत्यांना फारच आनंद झालाय
गुलाबी पैठणी आणि त्यासह पैठणीचा साज असणारे उपरणं तेजस्विनीने घेतले होते. तिच्या ब्लाऊजने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ब्लाऊजवर समाधानचं नाव कोरण्यात आलं आहे
तेजस्विनी या लुकमध्ये खूपच सुंदर आणि एखाद्या राजकुमारीसारखी दिसतेय. तिच्या रंगावर हा रंग अधिक खुलून आल्याचे दिसून येत आहे
हातात हिरवा चुडा, हेव्ही ब्लाऊज आणि पैठणीचा संपूर्ण साज तेजस्विनीने ल्याला आहे. तर समाधाननेदेखील हेव्ही शेरवानी परिधान केली आहे
तेजस्विनीना या साडीसह सोन्याचे दागिने, मांगटिका,कानातले आणि मराठमोळा लुक पूर्ण करताना नाकात डिझाईनर नथ परिधान केलीये
कुटुंबीयांनी तेजस्विनी आणि समाधानला भरभरून आशिर्वाद दिले आहेत आणि उभयतांनी सर्वांच्या पाया पडून संसारासाठी शुभेच्छा घेतल्या