गौराईला सजवताना गळ्यात घाला 'हे' ठसठशीत देखणे दागिने
गौरींसाठी ठसठशीत आणि भरीव दागिन्यांची निवड करताना ३ ते ४ पदरी एकदाणी किंवा ढोलक मण्यांची माळ तुम्ही खरेदी करू शकता. मोहन माळ किंवा सोन्याच्या मोठ्या मण्यांची माळ गौराईवर अतिशय खुलून दिसेल.
पारंपरिक आणि मराठमोळा दागिने म्हणजे वज्रटीक आणि ठुशी. नऊवारी किंवा सहावारी साडी नेसवल्यानंतर गौरीला तुम्ही वज्रटीक घालू शकता. यामुळे गळा भरलेला दिसेल.
मोत्याचे दागिने कोणत्याही साडीवर अतिशय सुंदर दिसतात. चिंचपेटी, तन्मणी, मोती हार किंवा इतर मोठ्या मोत्यांचे दागिने गौराईला तुम्ही घालू शकता. यामुळे गौरीचा लुक आणखीनच रॉयल दिसेल.
पूर्वीच्या काळी सर्वच महिला गळ्यात पुतळी हार परिधान करत होत्या. बाजारात लहान किंवा मोठ्या आकाराचे पुतळी हार सहज उपलब्ध होतात. पुतळी हार घातल्यामुळे गौरी अतिशय सुंदर दिसेल.
राणी हार, लक्ष्मी हार किंवा वजनाने मोठे असेलेले दागिने गळ्यात परिधान करू शकता. गौराईचा लुक अतिशय पारंपरिक दिसण्यासाठी तुम्ही वरील मराठमोळे दागिने घालू शकता.