सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित चावून खा 'हा' पांढरा पदार्थ
लसूणमध्ये अॅलिसिन नावाचे घटक आढळून येते, ज्यामुळे शरीरात बॅक्टरीया वाढत नाहीत. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एक किंवा अर्धा लसूण भाजून खाल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल. सर्दी, ताप आणि संसर्ग टाळण्यास मदत होईल.
शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी लसूण चावून खावी. पोटातील वायू, बद्धकोष्ठता आणि पित्ताच्या समस्यांपासून आराम मिळतो. आतड्यांमध्ये साचून राहिलेले हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी उपाशी पोटी लसूण चावून खावा.
शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित एक लसूण खावी. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये हानिकारक कोलेस्ट्रॉल साचून राहत नाही आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होते.
लसूण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. शरीरात कर्करोगाच्या अनियंत्रित पेशी वाढू नये म्हणून लसूण खावी. यामुळे संपूर्ण शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
मधुमेह वाढल्यानंतर वेगवेगळ्या गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी उपाशी पोटी एक लसूण चावून खावा. यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढत नाही आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते.