मराठी सिनेसृष्टीतून हिंदी सिनेसृष्टीत असे सर्वीकडे आपल्या नावाचा कहर करणारी गोंडस अभिनेत्री श्रिया पिळगावकर Elle Graduates २०२४ मध्ये दिसून आली आहे. तिने या संबंधित नवीन इंस्टाग्राम पोस्ट तिच्या हँडलवर शेअर केली आहे. यावेळी बी टाऊनचे अनेक कलाकार मंडळी या सोहळ्यात हटके आणि निरनिराळ्या अवतारात दिसून आले होते.
श्रिया पिळगावकरचा 'हा' हटके लुक पाहिलात का? (फोटो सौजन्य - Social Media)

अभिनेत्री श्रिया पिळगावकरने तिच्या @shriya.pilgaonkar या इंस्टाग्राम हॅन्डलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीचा लुक जरा हटकेच आहे.

श्वेत रंगातील वेस्टर्न आऊटफिटमध्ये श्रियाचे सौंदर्य अधिक निखरून आले आहे. या लूकमध्ये श्रिया फार आकर्षक आणि सुंदर दिसत आहे.

गळयात सुंदर दोन नेकलेस घालून, जास्त दागदागिन्यानाचा पेहराव न करत श्रियाने सौंदर्यात जणू बाजीच मारली आहे. नेटकरी तर फिदाच झाले आहेत.

श्रियाने कॅप्शनमध्ये तिच्या आऊटफिटबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच तिने #ElleGraduates2024 हा हॅशटॅग वापरात आणत @elleindia ला टॅग केले आहे.

श्रियाच्या चाहत्यांनी कॉमेन्टमध्ये गर्दीच केली आहे. मुळात, छायाचित्रांमध्ये तिने मारलेली हटके स्टाईल चाहत्यांना फार आवडली आहे.






