जत तालुक्यातील अंकलगी गावात पाण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. ऐन दिवाळीत कोरड्या पडलेल्या तलावात 1001 दिवे लावून काळी दिवाळी साजरी करण्यात आली.
तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या कारभाराचा निषेध नोंदवला. तलावात तातडीने पाणी सोडण्याची मागणी करत, मागणी मान्य न झाल्यास याच तलावात बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला.