बॉलिवूडचे सर्वात महागडे घटस्फोट; एकाला तर मोजावे लागले तब्बल 400 कोटी...
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी लग्नाच्या अवघ्या 13 वर्षांनंतर एकमेकांना घटस्फोट दिला. यावेळी सैफने 5 कोटी रुपये मोजले. यांनतर सैफने अभिनेत्री करीना कपूरशी लग्नगाठ बांधली
पहिल्या बायकोच्या निधनानंतर संजय दत्तने रिया पिल्लईसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. 2005 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. संजयने रियाला 8 कोटी रुपयांचे अपार्टमेंट तसेच एक आलिशान कार आणि घटस्फोट होईपर्यंतचा तिचा सर्व खर्च उचलला
लग्नाच्या 19 वर्षांनंतर मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 2017 मध्ये एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यावेळी मलायकाने 10-15 कोटी रुपयांची मागणी केल्याचे सांगितले जाते
प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरने 2003 मध्ये उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले. 2016 साली त्यांनी एकमेकांना घटस्फोट दिला आणि करिश्माला 70 कोटी रुपये आणि एक आलिशान घर देण्यात आले
2002 मध्ये आमिर खान आणि रीना दत्ता यांनी एकमेकांना घटस्फोट दिला. यावेळी रिनाला 50 कोटी रुपयांची पोटगी देण्यात आली
लग्नाच्या अवघ्या 14 वर्षांनंतर ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांनी लग्नाच्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावेळी सुजैनने 400 कोटी रुपयांची मागणी केल्याचे रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले