देशाचा अर्थसंकल्प सादर होणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे
अलीकडील गेले काही वर्ष अर्थमंत्री निर्मला सितारामन या अर्थसंकल्प सादर करतात.
पण तुम्हाला माहितेय का ? देशात असे काही तज्ज्ञ होऊन गेले ज्यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प जाहीर केला.
देशाचे माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी आतापर्यंत 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला. तसंच दिवंगत नेते प्रणव मुखर्जी यांनी देखील 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला.
देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात मोरारजी देसाई देखील अव्वल स्थानी होते. त्यांच्या कार्यकाळात मोरारजी देसाई यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जर आणखी एकदा अर्थसंकल्प जाहीर केला तर त्या मोरारजी देसाईंचा देखील रेकॉर्ड मोडतील.