23 जुलै रोजी संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारमण बजेट सादर करणार आहेत. याकडे संपूर्ण भारताचे लक्ष आहे
या बजेटकडून मध्यमवर्गीय व्यक्तींना अनेक आशा असून टॅक्सबाबत काही चांगली घोषणा होणार का याची वाट पाहिली जातेय
यावर्षी करामध्ये अधिक सूट मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून मागच्या वर्षी 2.5 वरून 3 लाख करण्यात आले होते
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अंतिम वेतनात 50% पेन्शनची हमी घोषित करण्याची शक्यता आहे
रिपोर्ट्सनुसार लखपती दीदी योजनेसंदर्भातही शासन घोषणा करू शकेल अशी आशा आहे
तसंच शेतकरी सन्मान योजनेच्या निधीतून मिळणाऱ्या पैशांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे
वरीष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकीट भाड्यामध्ये सूट मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे