उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणारे नारळ पाणी आरोग्याला पोहचवू शकते हानी
वाढलेले वजन कमी करताना बऱ्याचदा महिला नियमित नारळ पाणी पितात. मात्र अतिप्रमाणात नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीराचे कमी झालेले वजन पुन्हा वाढण्याची शक्यता असते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी नारळ पाणी धोक्याचे ठरू शकते. नारळाच्या पाण्यात असलेले गुणधर्म मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक ठरतात. याशिवाय रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
गॅस्ट्रोइंटेस्टाइनलची समस्या असलेल्या लोकांनी नारळ पाणी पिऊ नये. नारळ पाणी प्यायल्यामुळे पोटात दुखणे, पोट फुगणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू लागतात.
मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांनी नारळ पाण्याचे कमीत कमी सेवन करावे. यामुळे रक्तातील पोटॅशियमची पातळी वाढू शकते. जे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे.
नारळ पाण्यात असलेली नैसर्गिक साखर आणि आम्लता दातांच्या आरोग्यासाठी गुणकारी नाही. यामुळे दात किडणे, दातांच्या हिरड्या दुखणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.