सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी गाजर आल्याच्या रसाचे सेवन
सकाळी उठल्यानंतर नियमित गाजर आल्याच्या रसाचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये चिकटून बसलेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. ज्यामुळे पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत.
गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन युक्त घटक आढळून येतात. हे घटक शरीरात गेल्यानंतर विटामिन ए मध्ये रुपांतरीत होतात. मोतीबिंदू आणि रात्रीच्या अंधत्वाच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी नियमित गाजरचा रस प्यावा.
पोटफुगी, गॅस आणि अपचन इत्यादी सर्वच समस्यांपासून दूर राहण्यासाठी उपाशी पोटी आल्याच्या रसाचे सेवन करू शकता. आल्याचा रस कोमट पाण्यात मिक्स करून प्यायल्यास पचनक्रिया सुधारेल.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. कोणतेही सप्लिमेंट्स पिण्याऐवजी नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेला गाजर आणि आल्याचा रस प्यावा.
आल्यामधील जिंजरॉलचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे शरीरात वाढलेली जळजळ कमी होते आणि आरोग्य सुधारते. शरीराच्या आतील अवयवांना आलेली सूज कमी करण्यासाठी आल्याचा रस प्यावा.