उन्हाळ्यात बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित करा 'या' फळाच्या रसाचे सेवन
उन्हाळ्यामध्ये डिहाड्रेशनची समस्या प्रामुख्याने उद्भवते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आठवड्यातून एकदा दोनदा किंवा तीनदा अननसाच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीरातील कमी झालेली पाण्याची कमतरता भरून निघते.
पोटात दुखणे, बद्धकोष्ठता, गॅस किंवा अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात अननसाच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे पोटासंबंधित सर्व समस्या दूर होतात.
अननसाचा रस प्यायल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. वाढत्या आजारांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे शरीराचे कार्यात अडथळे निर्माण होत नाहीत.
उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी अननसाच्या रसाचे सेवन करावे, कारण यामध्ये असलेले विटामिन सी त्वचा सुंदर आणि चमकदार करण्यासाठी मदत करते.
वाढलेले वजन कमी करताना कोणत्याही प्रोटीनशेकचे सेवन करण्याऐवजी हेल्दी सरबताचे सेवन करावे. यामुळे भूकेवर नियंत्रण राहते आणि शरीरसुद्धा अनेक फायदे होतात.