सुटलेले पोट कमी करण्यासाठी नियमित करा 'या' जपानी पेयांचे सेवन
जपानच्या प्रत्येक घरात सकाळी उठल्यानंतर सगळेच ग्रीन टी चे सेवन करतात. ग्रीन टी प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. यामध्ये असलेले कॅटेचिन आणि अँटीऑक्सिडंट्स पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी करण्यासाठी मदत करतात.
आजकाल सगळीकडेच ट्रेंडिंग असलेले पेय म्हणजे मॅचा ड्रिंक. यामध्ये ग्रीन टीपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. याशिवाय चयापचय गतिमान सुधारण्यासाठी आणि कॅलरीज बर्न करण्यासाठी मॅचा ड्रींक प्यावे.
कोम्बू चहा हा केल्प पासून बनवला जातो. यामध्ये शरीरास आवश्यक असलेले सर्वच घटक आढळून येतात. खनिजे आणि आयोडीनचे प्रमाण जास्त असल्यामुळे थायरॉईड नियंत्रणात राहण्यास मदत होते.
जपानमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बार्ली टी चे सार्वधिक सेवन केले जाते. याची चव भाजलेल्या बार्लीसारखी असते. यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.पोट किंवा शरीरावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी बार्ली टी चे सेवन करावे.
शिसोच्या पानांपासून बनवलेला शिसो चहा चवीला अतिशय सुंदर लागतो. या चहाचे १५ दिवस केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यास मदत होईल. तसेच शरीर डिटॉक्स करण्यासाठी शिसो चहाचे सेवन केले जाते.