आठवडाभर नियमित आवळ्याचे सेवन केल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी त्वचा आणि केसांसाठी अतिशय प्रभावी ठरते. यामधील पदार्थ शरीरात कोलेजन वाढवण्याचे काम करतात. यामुळे त्वचा दीर्घकाळ मुलायम आणि सुंदर दिसू लागते.
केस गळणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा, केसांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे. आवळा खाल्यामुळे केस कमी प्रमाणात गळतात.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळ्याचे किंवा आवळा पावडर कोमट पाण्यात मिक्स करून प्यावी. यामुळे शरीरात साचलेली विषारी घाण बाहेर पडून जाते आणि वजन झपाट्याने कमी होते.
गुडघे दुखणे किंवा कंबर दुखीच्या वेदना वाढू लागल्यानंतर आवळा खावा. यामुळे वेदनांपासून आराम मिळतो. शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी आवळा खावा. यासोबतच तुम्ही थंडगार आवळ्याच्या रसाचे सेवन करू शकता.
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे. तसेच आवळा खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही आणि मधुमेह नियंत्रणात राहतो.