महिलांमध्ये 'या' कारणांमुळे वाढतं आहे डिप्रेशन
महिलांमध्ये मासिक पाळी, गर्भधारणा, मोनोपॉज यासारख्या हार्मोनल बदलांमुळे नैराश्य येण्याची शक्यता असते. त्यामुळे महिलांनी कामाच्या धावपळीमधून वेळ काढत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
कौटुंबिक जीवन आणि सामाजिक दबावामुळे अनेकदा महिला डिप्रेशनमध्ये जातात. कुटुंबातील चुकीच्या वातावरणच परिणाम महिलांच्या मानसिक आरोग्यावर लगेच दिसून येतो, ज्यामुळे मानसिक दृष्ट्या महिला खचून जातात.
गरिबी, बेरोजगारी आणि घरगुती हिंसाचार यासारखे सामाजिक आणि आर्थिक काहीवेळा महिलांमधील डिप्रेशनचे कारण बनतात. महाराष्ट्रासह राज्यातील इतर भागांमध्ये घरगुती हिंचारामध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर दिसून येतो.
मानसिक आरोग्य, स्वाभिमान, आत्मविश्वास इत्यादी अनेक गोष्टींमुळे महिला डिप्रेशनमध्ये जातात. ज्याच्याचा परिणाम महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दिसून येतो.
वायू प्रदूषणामुळे 15 ते 49 वयोगटातील महिलांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण वाढत आहे. टीओआयमध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार, प्रदूषणामुळे जगभरात तणाव आणि नैराश्याच्या प्रकरणांमध्ये 44% वाढ झाली आहे.