(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी पांढऱ्या पोशाखात गाडीत रडताना दिसत आहेत. संपूर्ण धर्मेंद्र कुटुंब दुःखात बुडाले आहे.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल देखील पांढऱ्या सूटमध्ये दिसली, तिने दुपट्ट्याने चेहरा झाकत आपले अश्रू लपवले आहे.
धर्मेंद्र यांच्यावर विले पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांचा मोठा मुलगा सनी देओलने चितेला अग्नी दिला असल्याचे समजले आहे.
धर्मेंद्रचा नातू त्याच्या घराबाहेर दिसला, त्यानेही पांढरा शर्ट घातला होता. तसेच तो देखील दुःखी दिसत आहे.
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी धर्मेंद्र यांच्या घरी भेट दिली. आमिर खान धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले आहे.
अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन हेही धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराला पोहचलेला दिसत आहे.