या ठिकाणी दररोज पडतो हिऱ्यांचा पाऊस, शास्त्रज्ञांनी शोधला अवकाशातील सर्वात श्रीमंत ग्रह
शास्त्रज्ञांनी अवकाशात हिऱ्यांचा पाऊस पाडणाऱ्या दोन ग्रहांना शोधून काढले आहे. ज्यातील पहिला ग्रह म्हणजे यूरेनस तर दुसरा ग्रह आहे नेप्च्यून. इथले वातावरण इतके अद्वितीय आहे की इथ हिऱ्यांच्या निर्मितीची प्रक्रिया नेहमीच सुरु राहते
यूरेनस आणि नेप्च्यूनते संपूर्ण वातावरण मिथेन वायूने भरलेले आहे, हेच या चमत्कारिक पावसाचे खरे कारण आहे. मिथेनमध्ये कार्बन असते, जो हिऱ्यांच्या निर्मितीचा प्रारंभ बिंदू आहे, यालाच शास्त्रज्ञ हिऱ्यांचा पाऊस असे म्हणतात
या ग्रहांच्या अतिदाबामुळे आणि तापमानामुळे ते इथे उपलब्ध असलेल्या मिथेनचे विघटन करते, जे आपोआपच हिऱ्यांच्या निर्मितीसाठी फायद्याचे ठरते. यूरेनस आणि नेप्चूनच्या आतील भागात पृथ्वीच्या वातावरणाच्या लाखो पट जास्त दाब असतो.
वातावरणाच्या तीव्र दाब आणि उष्णतेमुळे मिथेनचे रेणू तुटतात तेव्हा कार्बन अणू वेगळे होतात आणि एकत्र येऊ लागतात. हे कार्बन अणू हळूहळू एकत्र येऊन एक कठीण, मजबूत हिऱ्याचे स्फटिक तयार करतात.
गुरुत्वाकर्षणामुळे हे हिरे स्फटिक ग्रहाच्या खोल थरांमध्ये पडतात, ज्यामुळे शास्त्रज्ञ एक प्रकारचा "हिऱ्याचा पाऊस" म्हणतात. दुर्दैवाने मानव मात्र या ग्रहांवर राहू शकत नाही कराण या दोन्ही ग्रहांवरील वातावरण मानवी वस्तीसाठी प्रतिकूल नाही, इथे कोणती उपकरणेही काम करु शकत नाही