जास्त पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते का? (फोटो सौजन्य: iStock)
वाढते वजन आज हे अनेकांसाठी डोकेदुखी बनले आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे धोकादायक आजार वाढू लागले आहेत. अशा परिस्थितीत स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी विविध उपायांचा अवलंब केला पाहिजे.
हार्वर्डच्या एका अहवालात असे म्हटले आहे की पाणी पिण्याने वजन कमी करणे सोपे होते. जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायल्यास वजन कमी करण्यात खूप मदत होते. त्याचा परिणामही लवकरच दिसून येतो.
वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची वेळ योग्य पाळणे फार महत्वाचे आहे. दिवसभरात थोड्या थोड्या प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
जेवण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खावेसे वाटत नाही. पुष्कळ वेळा लोक आपल्या तहानला भूक समजतात आणि जास्त खातात. अशा स्थितीत पाणी प्यायल्याने ओव्हरइटिंग टाळता येते.
शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहिल्याने मेटाबॉलिज्म क्रिया सुधारते. यामुळे कॅलरी वेगाने बर्न होते, जे वजन कमी करण्यास मदत करते.