कानाची शोभा वाढवण्यासाठी परिधान करा 'या' डिझाईन्सची सुंदर कर्णफुल
नऊवारी किंवा पैठणी साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही स्टोन वर्क केलेले एअर कफ घालू शकता. स्टोनचे एअर कफ परिधान केल्यानंतर तुमचा लुक उठावदार दिसेल.
मोराचे नक्षीकाम असलेले सुंदर एअर कफ तुम्ही साडीवर घालू शकता. सोन्याचे एअर कफ आकाराने मोठे असले तरीसुद्धा साडी परिधान केल्यानंतर त्यावर घातल्यास अतिशय सुंदर दिसतील. सोन्याच्या एअर कफ मध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करून घेऊ शकता.
मोती आणि खड्यांचा वापर करून बनवलेले एअर कफ नऊवारी साडीवर अतिशय सुंदर दिसतात. या पद्धतीचे एअर कफ घातल्यास कान अतिशय सुंदर दिसतील.
कानांच्या मागे घेतलेल्या सुंदरी वेली कोणत्याही ड्रेसवर परिधान केल्यास तुमचा लुक उठावदार दिसेल. यामुळे तुमच्या कानांना कोणतीही इजा होणार नाही.
आपल्यातील अनेकांना आकाराने जास्त लहान आणि कमी वर्क असलेले दागिने परिधान करायला खूप आवडतात. अशावेळी तुम्ही या डिझाईन्सचे एअर कफ घालू शकता.