प्राजक्ता कोळीच्या आईने परिधान केलेल्या साडीची सर्वांना भुरळ!
निळ्या रंगाच्या साडीवर त्यांनी मोत्याचे सुंदर दागिने परिधान केले आहेत. मोत्याचे दागिने पैठणी साडीवर अतिशय खुलून दिसतात. मोती आणि पाचूंनी सजवलेल्या दोन थरांची रचना असलेला हार त्यांच्यावर अतिशय सुंदर दिसत आहे.
अर्चना कोळी यांनी नेसलेली साडी पाहून प्राजक्ताने देखील त्यांचे सौंदर्यचे खास कौतुक केले आहे. याशिवाय तिच्या वडिलांनीसुद्धा लग्नात पारंपरिक कपडे परिधान करून सुंदर फेटा बांधला आहे.
महाराष्ट्राचा पारंपरिक दागिना म्हणून ओळखलं असलेली नथ त्यांनी साडीवर परिधान केली आहे. मॉर्डन जमान्यात त्यांनी सुंदर असे पारंपरिक दागिने परिधान केले आहेत.
टेम्पल दागिन्यांमधील सुंदर आणि भरीव बांगड्या त्यांनी साडीवर घातल्यामुळे त्यांचा लुक अजूनच आकर्षक दिसत आहे. पैठणी साडीवर टेम्पल दागिने सुंदर दिसतात.
प्राजक्ताच्या लग्नात अर्चना कोळी यांनी निळ्या आणि जांभळ्या अशा दोन रंगाची छटा असलेली पैठणी साडी परिधान केली आहे. पैठणी साडीवर सोन्याची जर वापरून सुंदर डिझाईन करण्यात आली आहे.